शरद पवारांचा आजपासून दुष्काळ पाहणी दौरा ! पुरंदर आणि इंदापूर तालुक्यातील भागांची करणार पाहणी

Jun 12, 2024 - 08:33
 0  405
शरद पवारांचा आजपासून दुष्काळ पाहणी दौरा ! पुरंदर आणि इंदापूर तालुक्यातील भागांची करणार पाहणी

आय मिरर

ज्येष्ठ नेते शरद पवार आज पासून दुष्काळ पाहणी दौरा करणार आहेत. शरद पवार हे आज पुरंदर तालुक्यातील आणि इंदापूर तालुक्यातील गावांना भेटी देणार असून त्या ठिकाणची परिस्थिती समजून घेणार आहेत.

पुरंदर तालुक्यातील दुष्काळ पाहणी वेळी त्यांच्यासोबत पुरंदर हवेलीचे आमदार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप देखील उपस्थित राहणार आहेत.

सकाळी साडेनऊ वाजल्यापासून या दुष्काळ पाहणी दौऱ्याला सुरुवात होणार असून शरद पवार पहिल्या सत्रात पुरंदर तालुक्यातील निरा वाल्हे वागदरवाडी बहिरजीचीवाडी मोरीजीचीवाडी आदींसह इतर गावांची पाहणी करुन दुपारुन इंदापूर तालुक्यातील निरवांगी, खोरीची आणि बोराटवाडी गावांची पाहणी करुन नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow