मोठी बातमी | अजित दादांच्या अपघात तपासाला वेग ! चौकशीसाठी व्हिएसआरचा मालक रोहित सिंग सीआयडी च्या कार्यालयात दाखल
आय मिरर
दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी आता तपासाला वेग आला आहे. सीआयडीने व्हीएसआर कंपनीचा मालक रोहित सिंग याला अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी चौकशीसाठी त्यांच्या कार्यालयात बोलावलं आहे. सध्या सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून रोहित सिंग याची चौकशी केली जात आहे.
अजित पवार यांच्या अपघाती निधनाप्रकरणी व्हीएसआर विमान कंपनीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सातत्याने आमदार रोहित पवार करत आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन आमदार रोहित पवार यांनी आतापर्यंत चार पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. संबंधित विमान कंपनीच्या मालकावर आणि त्यामध्ये दोषी असणाऱ्या सर्वांवर गुन्हा दाखल करावा यासाठी रोहित पवार यांनी दोन वेळा पोलीस ठाणेही गाठलं होतं.
रोहित पवार स्वतः डीजीसीए सह व्हीएसआर विमान कंपनी आणि इतर दोषी असणाऱ्यांवरती एफ आय आर दाखल करावा यासाठी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले होते. मात्र त्या ठिकाणी रोहित पवार यांची तक्रार घेण्यात आली नव्हती. केवळ एक तक्रारी अर्ज स्वीकारण्यात आला.
यानंतर ज्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात हा अपघात घडला त्या बारामती तालुका पोलीस ठाण्यातही एफ आय आर दाखल करण्यासाठी रोहित पवार आपल्या कार्यकर्त्यांसह दाखल झाले. यात अजित पवार प्रेमी ही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रोहित पवार यांना पाठबळ दर्शवण्यासाठी रोहित पवार यांची चुलत बंधू युगेंद्र पवार आणि रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवारही उपस्थित होते. मात्र त्या ठिकाणीही रोहित पवार यांच्या मागणीप्रमाणे एफ आय आर फाटला नाही. केवळ एक तक्रारी अर्ज घेण्यात आला.
जोपर्यंत आम्हाला सीआयडी या संदर्भात एफ आय आर दाखल करण्याची सूचना देत नाही तोपर्यंत आम्ही तो दाखल करू शकत नाही असं पोलिसांचं म्हणणं असल्याचं युगेंद्र पवार यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
दरम्यान सीआयडी कडून तपासाला दिरंगाई केली जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी सातत्याने केला आहे. यानंतर आता सीआयडीच्या तपासाला वेग आल्याचा पाहायला मिळत असून अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी चौकशी करिता व्हीएसआर विमान कंपनीचा मालक रोहित सिंग याला सीआयडीने कार्यालयात बोलावले असून त्याची चौकशी केली जात आहे. यानंतर सीआयडी नक्की काय कारवाई करते हे पाहणं महत्वाचं असेल.
दरम्यान डीजीसीएने प्रथम दर्शनी दिलेल्या अहवालात व्हीएसआर विमान कंपनीचा निष्काळजीपणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच कारणीभूत असल्याचं म्हटलं होतं. शिवाय कंपनीकडून विमानांच्या मेंटनस मध्ये दिरंगाई होत होती. याशिवाय काही सुरक्षेच्या बाबतीत ही त्रुटी निदर्शनास आल्या होत्या. याच मुद्द्यावरून आमदार रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या मालकाविरोधात या अपघात प्रकरणी एफ आय आर दाखल करावा अशी मागणी केलेली आहे.
अपघात की घात संशयाचे धुकं दाट...
दरम्यान दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा झालेला अपघाती मृत्यू हा निव्वळ अपघात आहे का यात काही घातपात आहे याबाबत दिवसेंदिवस संशयाचं धुक दाट होत चालला आहे. 28 फेब्रुवारी रोजी या संदर्भात ए ए आय बी ने आपला 22 पानांचा अहवाल सादर केला. यामध्ये मात्र ए ए आय बी ने अजित पवार ज्या व्हीएसआर कंपनीच्या विमानात होते ते विमान अगोदर झाडांना धडकलं आणि त्यानंतर जमिनीवरती कोसळलं अशी माहिती दिली आहे. मात्र याच माहितीवरून वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. घटनास्थळी विमानाला धडकेल किंवा अडथळा निर्माण करील असं एकही झाड पाहायला मिळत नाही. त्यामुळे अशा पद्धतीचा अहवाल दिलाच असा असा संतप्त सवाल अजित पवार समर्थकांकडून आणि आमदार रोहित पवार यांच्याकडून देखील केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणात कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय का ? असाही सवाल सातत्याने आमदार रोहित पवार विचारत आहेत.
What's Your Reaction?