काळजाचा थरकाप ! दुचाकी आणि कारचा भीषण अपघात, माय-लेकीचा जागीच अंत

Mar 5, 2026 - 15:18
Mar 5, 2026 - 15:23
 0  2750
काळजाचा थरकाप ! दुचाकी आणि कारचा भीषण अपघात, माय-लेकीचा जागीच अंत

आय मिरर 

बारामती पारवडी मार्गावर दुचाकी आणि चार चाकी चा भीषण अपघात झालाय या अपघातात दुचाकी वरील मायलेकीचा जागीच मृत्यू झालाय. तर मृत महिलेचा पती आणि तिचा लहान मुलगा हे देखील गंभीर जखमी झालेत. काल मध्यरात्रीच्या वेळी हा अपघात झालाय.

रूपाली मयूर कोकणे असं मृत महिलेचे नाव असून सानवी मयूर कोकणे ही पाच वर्षाची चिमुकली देखील या अपघातात मृत पावली आहे.

तर मृत महिलेचा पती मयूर कोकणे आणि तिचा दोन वर्षाचा लहान मुलगा हे दोघेजण या अपघातात गंभीर जखमी झाले त्यांवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार बारामती तालुक्यातील पारवडी येथील कोकणे वस्तीवरील कोकणे कुटुंब आपल्या दुचाकीवरून बारामतीकडून पारवडी मार्गे निघाले होते. याचवेळी बारामती पारवडी मार्गावर परीट वस्ती लगत खडकी कडून बारामतीच्या दिशेकडे येणाऱ्या चार चाकी वाहनाची दुचाकीला जोरात धडक बसली. या दुर्घटनेत मायलेकीचा जागीच मृत्यू झाला.

या संपूर्ण घटने प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास केला जात आहे. मात्र भीषण अपघातात मायलेकीचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ देखील व्यक्त केली जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow