दहा वर्षीय बालिकेवर अत्याचाराचा आरोप ! ६० वर्षीय आरोपीला जेजुरी पोलिसांकडून अटक
आय मिरर
पुरंदर तालुक्यातील कोळविहीरे येथे दहा वर्षीय अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली 60 वर्षीय झुंबर सिताराम खोमणे याच्याविरुद्ध जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,आरोपीला अटक करण्यात आली आहे.
11 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलय. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह पोक्सो कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास जेजुरी पोलिसांकडून सुरू आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही संतापजनक घटना मंगळवारी (दि. ११ ऑगस्ट) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही आरोपी झुंबर खोमणे याने तिला फूस लावून घराच्या पाठीमागील शेतातील सिताफळ बागेत नेले. तेथे तिचेवर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला.
या घटनेनंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तत्काळ जेजुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) मधील संबंधित कलमे तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO Act) मधील कलम ४ व ६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जेजुरी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपी झुंबर खोमणे यास बेड्या ठोकल्या आहेत. महिला पोलीस उपनिरीक्षक राणे या प्रकरणाचा पुढील तपास करत असून पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे. या घृणास्पद प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
What's Your Reaction?