मोठी बातमी | अखेर अझर शेख पोलिसांच्या ताब्यात ; भिगवण प्रकरणानंतर होत होती अटकेची मागणी

Feb 27, 2026 - 11:11
Feb 27, 2026 - 11:19
 0  3432
मोठी बातमी | अखेर अझर शेख  पोलिसांच्या ताब्यात ; भिगवण प्रकरणानंतर होत होती अटकेची मागणी

आय मिरर 

बातमी आहे पुण्याच्या दौंड मधून पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अखेर अझर शेख ला गजाआड केलं आहे.अझर शेख हा दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावचा माजी सरपंच असून दौंड पोलीस ठाण्याअंतर्गत त्याच्यावर गंभीर गुन्ह्या दाखल होता. त्यात अझर शेख गेले अनेक वर्षे फरार होता. 

भिगवण येथील कथित अपहरण प्रकरण घडल्यानंतर अझर शेख याच्या अटकेची मागणी सातत्याने होत होती. भिगवण प्रकरणामध्ये जरी अझर शेख थेट आरोपी नसला तरी या  प्रकरणातील आरोपींना त्याचा वरदहस्त असू शकतो असा आरोप तरुणीच्या कुटुंबीयांसह हिंदू समाजाचा होता. त्यामुळे आता अझर शेखला जरी दौंड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पूर्वीच्या गुन्ह्यात अटक झाली असली तरी भिगवण प्रकरणाच्या तपासात अझर शेख चे कनेक्शन असल्यास या प्रकरणात त्याला देखील आरोपी केलं जाऊ शकतं. त्यामुळे अझर शेखच्या अडचणी वाढू शकतात.

शिवाय भिगवण प्रकरणातील आरोपी जहीर शेख आणि आयान शेख यांचा तो चुलता आहे, दौंड चे भाजपचे आमदार राहुल कुल यांचा तो अत्यंत जवळचा कार्यकर्ता असल्याचा आरोप देखील भिगवण प्रकरणातील तरुणीच्या कुटुंबाकडून केला जात होता आणि याला अनुसरूनच हिंदू समाजाकडून अझर शेखच्या अटकेची मागणी केली जात होती. 

अझर शेख यासोबत युवराज मेंगावडे याला देखिल पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.

अवैध वाळू उपसा प्रकरणात अझर शेख याने स्वामी चिंचोली गावाच्या महसूल विभागाच्या तलाठ्याला मारहाण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.या गुन्ह्यात तो फरार होता,अखेर त्याला अटक करण्यात आली असून त्याला दौंड न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

अखेर अझर शेखला पोलिसांनी गजाआड केल आहे दौंड पोलीस ठाणे अंतर्गत त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल होते आणि त्या गुन्ह्यांमध्ये अझर शेखला पोलिसांनी अटक केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow