दौंड मध्ये 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या ; शीर आणि धड केलं वेगळं

Aug 20, 2026 - 15:46
Aug 20, 2026 - 15:51
 0  105
दौंड मध्ये 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या ;  शीर आणि धड  केलं वेगळं

आय मिरर 

दौंड शहरातील आर.बी.1 नगरमोरी परिसरात 70 वर्षीय महिलेची निघृण हत्या करण्यात आली आहे.सुमन किसन शिंदे असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. विशेष म्हणजे आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहापासून महिलेचं शीर वेगळं करून दुसऱ्या ठिकाणी नेऊन टाकलं. या घटनेनंतर दौंड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या बारा तासांच्या आत दोघाजणांना गजाआड केलं आहे.

विकी उर्फ विक्रम अल्हाट आणि प्रसाद चव्हाण अशी संशयित आरोपींची नावं आहेत. चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली आहे.

संबंधित महिला ही तिच्या घरी एकटीच राहत होती, दरम्यान या प्रकरणातील आरोपींचा आणि महिलेचा वाद झाला होता हा राग मनात धरूनच गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी आरोपींनी या महिलेचा खून केला तिचं शीर तिच्या धडापासून वेगळं केलं.

पुरावा नष्ट करण्यासाठी ते इतर ठिकाणी नेऊन टाकलं. त्यानंतर या महिलेचा मृतदेह कुजू लागला त्या मृतदेहाचा उग्र वास सुटला याची खबर दौंड पोलिसांना लागली आणि त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. 

याप्रकरणी मयत महिलेची मुलगी तृप्ती सचिन हिरवे हिच्या तक्रारीवरून दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या असून त्यांनी गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow