दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळीचा पर्दाफाश ; होंडा सिटी कारमधून तलवार जप्त ! 5 जणांविरोधात गुन्हा दाखल
आय मिरर
इंदापूर पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पिंपरी बुद्रुक ते निरा नरसिंहपूर परिसरात संशयास्पद होंडा सिटी कारचा पाठलाग करत पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं..कारमध्ये तलवार कटावणी आणि पक्कड अशी, दरोड्यासाठी लागणारी हत्यारे आणि साहित्य आढळून आलं असून या प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोविंद संजू काळे, सुभाष राजू चव्हाण, कुणाल परशुराम काळे, कालू शंकर पवार आणि राहुल रमेश चव्हाण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून हे सर्वजण सोलापूर जिल्ह्यातील सवत गव्हाण येथील आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.
What's Your Reaction?