केडगाव गर्भलिंग चाचणी प्रकरणात मोठी अपडेट, असं चालायचं रॅकेट...
आय मिरर
दौंड तालुक्यातील केडगाव येथील गर्भलिंग निदान चाचणी आणि भ्रूणहत्या प्रकरणात आता आणखी एका महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सदिच्छा दिलीप शिंदे उर्फ सदिच्छा लक्ष्मण भोसले असं या महिलेचे नाव आहे.
सदिच्छा शिंदे ही या प्रकरणातील मुख्य आरोपी बोगस डॉक्टर अण्णासाहेब गिरी याची निकटवर्ती होती आणि गर्भलिंग निदानासाठी घेतले जाणारे पैसे हे सदिच्छा शिंदे हिच्या बँक खात्यावर जमा होत असल्याचा तपासात पुढे आलं आहे.
17 जून 2026 ला या प्रकरणात यवत पोलिसांनी पार्थ हॉस्पिटलची संचालिका डॉक्टर संगीता गायकवाड हिला अटक केली होती तिच्याकडे केलेल्या सखोल चौकशीनंतर या प्रकरणात मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरी याची मदतनीस सदिच्छा शिंदे होती. तिच्या माध्यमातूनच या सर्व गोष्टी चालायच्या.
सदिच्छा शिंदे ही गरोदर महिलांना मुख्य आरोपीच्या शिंदवणी येथील फार्म हाऊस आणि सिताई हाके नगर येथील फ्लॅटवर घेऊन जायची आणि त्या ठिकाणी त्यांची बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान चाचणी केली जात होती हे तपासात समोर आलं आहे.
आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी सात आरोपी निष्पन्न केलेत. यापैकी चार आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. तर या प्रकरणाशी संबंधित असणारा एक आरोपी यापूर्वीच एका पुण्यात जेलमध्ये आहे तर दोन आरोपी सध्या फरार आहेत.
या प्रकरणात सुरुवातीलाच 20 मे 2026 रोजी यातील मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरी याला बेड्या ठोकल्या त्यानंतर खोल तपासात 24 मे रोजी या प्रकरणात वाघोली येथील डॉक्टर अतुल जाधव याचं नाव समोर आलं पोलिसांनी अतुल जाधव याला बेड्या ठोकल्या. पुढे या प्रकरणात सोनोग्राफी मशीन पुरवणारा आरोपी नरेंद्र ठाकरे याच्यासह उरुळी कांचन येथील डॉ. सुंदरम कदम आणि भोर तालुक्यातील डॉ.मंदार माळी यांची नावे समोर आली.हे दोघेही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत तर नरेंद्र ठाकरे सध्या एका गुन्ह्यात तो जेलमध्ये आहे.
या संपूर्ण प्रकरणात बेकायदेशीरपणे महिलांची गर्भलिंग निदान चाचणी करून यातील काही महिलांचा गर्भपात दौंड तालुक्यातील केडगाव येथील पार्थ हॉस्पिटलमध्ये केला जात होता हे तपासात पुढे आले.एस आय टी ला तसे ठोस पुरावे सापडले आणि त्या पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी पार्थ हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर संगीता पांडुरंग गायकवाड यांना 17 जून 2026 रोजी दुपारी अटक केलेली आहे. या गर्भपाता वेळी या प्रकरणात अटक केलेली मुख्य आरोपीची मदतनीस सदिच्छा शिंदे ही देखील उपस्थित असायची अशी ही माहिती समोर आली आहे.
What's Your Reaction?