BIG BREAKING भिगवण जवळ भीषण अपघात ट्रॅक्टरचे दोन तुकडे एकाचा जागीच मृत्यू
आय मिरर
पुण्याच्या इंदापूरातील भिगवण–राशीन राज्य महामार्गावर डिकसळ नजिक ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला आहे.यात एकाच मृत्यू झाला आहे.अतुल बाबूलाल गजरमल राहणार कात्रज तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर असं मयत व्यक्तीचे नाव आहे.हा अपघात इतका भयानक होता की या अपघातात ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच भिगवण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. विशेष म्हणजे या ऊस हंगामात बारामती राशीन या राज्य मार्गावरील हा सातवा बळी ठरला असून, ट्रॅक्टर चालकांच्या बेफिकिरीमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
अशी घडली घटना...
भिगवण–राशीन राज्य महामार्गावर डिकसळ नजिक ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला.या अपघातात चारचाकी स्विफ्ट कार ( एम.एच. 12 के.वाय. 1615) आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची (एम एच 45 एफ 3025) जोरदार धडक झाली.
या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून चार चाकी वाहनातील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.या अपघातात सुदैवाने ट्रॅक्टर चालकाला मोठी दुखापत झाली नसली तरी या अपघातात एकाचा मृत्यू होऊन दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
What's Your Reaction?