सरडेवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी गयाबाई तोबरे बिनविरोध...

Aug 14, 2025 - 11:24
Aug 14, 2025 - 11:49
 0  515
सरडेवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी गयाबाई तोबरे बिनविरोध...

आय मिरर 

इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी गयाबाई अभिमान तोबरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली, या निवडीनंतर गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय. पूर्वीचे उपसरपंच वैशाली मल्हारी शिद यांनी स्वखुशीने राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती.

सरडेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच सुप्रिया कैलास कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली रिक्त झालेल्या जागी सरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य गयाबाई अभिमान तोबरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने आणि तो वैध ठरल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्राम विकास अधिकारी वैभव जाधवर यांनी गयाबाई तोबरे यांच्या उपसरपंच निवडीची घोषणा केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. 

या निवडीनंतर गुलालाची उधळण करीत ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केला. नवनियुक्त उपसरपंच गयाबाई तोबरे यांना उपस्थित सरपंच सदस्याने ग्रामस्थांनी निवडीच्या शुभेच्छा दिल्या.

गावाचे सरपंच आणि सर्व सदस्यांना सोबत घेऊन सर्वांच्या सहकार्याने गावच्या विकासासाठी आपण काम करणार असल्याची प्रतिक्रिया निवडीनंतर नवनियुक्त उपसरपंच तोबरे यांनी दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow