बंधाऱ्याचे लोखंडी दरवाजे चोरणारे सहा जण जेरबंद ! इंदापूर पोलिसांची कारवाई

Nov 2, 2025 - 13:09
Nov 2, 2025 - 13:09
 0  2217
बंधाऱ्याचे लोखंडी दरवाजे चोरणारे सहा जण जेरबंद ! इंदापूर पोलिसांची कारवाई

आय मिरर 

पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपुर सराटी परिसरातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे लोखंडी दरवाजे चोरी करणाऱ्या सहा आरोपींना इंदापूर पोलिसांनी जेरबंद केला आहे. नागपूर पोलिसांनी या सहा जणांकडून 41 लोखंडी दरवाजे, एक पिकअप जीप आणि एक युनिकॉर्न मोटारसायकल असा मिळून 8 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

या आरोपींनी इंदापूरसह अकलूज, टेंभुर्णी, पंढरपूर आणि मंगळवेढा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत देखील आणखी तीन ते चार चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

समाधान मदने, गणेश खंडागळे, मयूर वायदंडे, मनोज म्हडले, प्रशांत जाधव आणि प्रणिल मदने अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सध्या या सहा आरोपींना इंदापूर न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावले आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीतील नीरा नरसिंगपूर, सराटी परिसरात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. या बंधाऱ्यांवरील लोखंडी बर्ग (दरवाजे) चोरीला जाण्याच्या घटना समोर येत होत्या. याच पार्श्वभूमीवर 30 ऑक्टोबर रोजी शिवाजी देशमुख यांनी चोरीची तक्रार दिली होती.

तक्रार मिळताच इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक या गुन्ह्याच्या शोधकामी रवाना केले. बावडा पोलीस दुरक्षेत्रातील हवालदार चंदनशिवे, लोखंडे, करचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वेगाने सापळा रचत संशयितांचा पाठलाग केला. पोलिसांच्या दक्षतेमुळे केवळ दोन तासांतच चोरटे जेरबंद करण्यात आले.

या कारवाईत समाधान मदने, गणेश खंडागळे, मयूर वायदंडे, मनोज म्हडले, प्रशांत जाधव आणि प्रणिल मदने या सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून 41 लोखंडी बर्ग( दरवाजे), एक पिकअप जीप आणि एक युनिकॉर्न मोटारसायकल असा मिळून 8 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चौकशीत आरोपींनी इंदापूरसह अकलूज, टेंभुर्णी, पंढरपूर आणि मंगळवेढा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आणखी तीन ते चार चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. सध्या आरोपी पोलिस रिमांडवर असून पुढील तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow