इंदापुरात ठाकरेंची शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवणार..!
आय मिरर
पुण्याच्या इंदापुरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याची तयारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सुरू केली असून इंदापरातील शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे.या बैठकीत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका मोठ्या ताकतीने लढवण्याचा निर्णय करण्यात आला आहे.
या बैठकीस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक तयारी, संघटनबांधणी आणि रणनीती यासंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय काळे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी 19 जानेवारी रोजी इंदापूर शहरातील शासकीय विश्रामगृहात ही बैठक पार पडली असून या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकतीने लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती इंदापूर तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी दिली आहे.
नितीन शिंदे म्हणाले की,जिल्हा संपर्कप्रमुख आ. सचिन अहिर यांच्या सूचनेनुसार इंदापूर तालुक्यात होणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवणारे शिवसैनिक पूर्ण ताकतीने आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका लढणार आहेत.
लवकरच जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणामध्ये पक्षाच्या बैठका पार पाडणारा असून या माध्यमातून पक्षाची विचारधारा आणि ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत.
VOTE इंदापूरच्या पळसदेव बिजवडी गटातून दीपक जाधव यांच्या उमेदवारीला तुमची पसंती किती ?
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकाभर उपक्रम...
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत. सामाजिक उपक्रमातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला जावा असा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचाही नितीन शिंदे यांनी सांगितले.
शासकीय विश्रामगहात पार पडलेल्या या बैठकीला शहरप्रमुख महादेव सोमवंशी, तालुका समन्वयक अरुण पवार, तालुका संघटक सुदर्शन रणवरे, उपतालुकाप्रमुख आप्पासाहेब डोंगरे, संदीप चौधरी, सोमनाथ शेंडे, युवासेनेचे तालुकाप्रमुख सचिन इंगळे, शहरप्रमुख अविनाश खंडाळे, शिवसेनेचे उपशहरप्रमुख संतोष क्षीरसागर, बंडू शेवाळे, दादा देवकर, विभागप्रमुख रणजित बारवकर, अभिजित पाटील, महादेव चोपडे, उपविभागप्रमुख विजय तरंगे, सुदर्शन माने, ब्रम्हदेव थोरात व इतर पदाधिकारी आढावा बैठकीस उपस्थित होते.
What's Your Reaction?