शाब्बास रे इंदापूर पोलीस ! एक-दोन नाही तर लाखो रुपयांचा गुटखा पकडला,तिघांवर गुन्हा दाखल

Aug 22, 2026 - 06:48
Aug 22, 2026 - 06:54
 0  793
शाब्बास रे इंदापूर पोलीस ! एक-दोन नाही तर लाखो रुपयांचा गुटखा पकडला,तिघांवर गुन्हा दाखल

आय मिरर 

इंदापूर पोलिसांनी अवैध गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. बावड्याच्या दिशेने येणाऱ्या पिकअप वाहनातून तब्बल 15 लाख 87 हजार रुपयांचा प्रतिबंधित विमल गुटखा जप्त करण्यात आला. गुटखा आणि पिकअप वाहन असा एकूण 23 लाख 77 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

या प्रकरणी वाहन चालक आजमखान महमूद पठाण याला अटक करण्यात आली आहे.कर्नाटकातील तिकोटा येथून विक्रीसाठी हा गुटखा आणला जात होता.प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि २० ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री सहा पोलीस फौजदार प्रकाश माने यांना गोपनीय बातमी मिळाली की एका पीकअप मालवाहतुक टेम्पोमधून इंदापूर पोलीस स्टेशनचे हददीतून विमल गुटख्याची मोठयाप्रमाणात वाहतूक होणार आहे. 

त्याप्रमाणे मिळालेल्या बातमीच्या आधारे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे व विजय कोल्हे यांचे अधिपत्याखाली सहा पो फौजदार प्रकाश माने, पो हवा सलमान खान, पो हवा सुकुमार भोसले, पो कॉ गणेश मुंडे आणी रात्रगस्तीवर असणारे अंमलदार पो हवा महेश माने, पो कॉ सचिन शिंदे, प्रशात साळवे, राहुल उदागे, वेदांत कोळी यांचं पथक तयार करण्यात आलं.

पथक तयार करुन हायवे रोडने जाणारे पिकअप वाहनांवर बारीक लक्ष ठेवण्यात आले.त्यावेळी बावडा बाजुकडून येणाऱ्या पीकअप वाहन नंबर MH42BU1029 याचे हौदयात मागील बाजूस रिकामे कॅरेट लावलेले होते. त्यावेळी त्यावरील चालक कावरा बावरा झाल्याचे लक्षात येताच त्या संशयीत पिकअप वाहनास वरील पोलिस पथकाने अडवले. वाहनात इंदापूर सरस्वतीनगर मधील आजमखान महमुद पठाण हा सोहेल अस्लम शेख याचा १५ लाख ८७ हजार ६४० रुपयेचा किमतीचा विमल गुटखा कर्नाटक राज्यातील ते कोटा गावातून घेऊन तो वाहतूक करीत होता. हा गुटका कर्नाटक येथील ते कोटा गावातून कमलेश याच्याकडून खरेदी करण्यात आला होता.

हा अवैद्य गुटखा पकडल्यानंतर संबंधित पोलीस पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी लक्ष्मीकांत साळवे यांना कळवले, साळवे यांनी समक्ष येवून पाहणी करुन त्याबाबत खात्री करुन वरील तीन इसमांचे विरुदध गुन्हा दाखल केला आहे. वाहन चालक आजमखान पठाण याला अटक करण्यात आली असून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे, पो कॉ हसीम मुलाणी हे करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow