बिग ब्रेकिंग | जिल्हाध्यक्ष गारटकरांनी घेतली मंत्री नितीन गडकरींची भेट,या विषयावर झाली चर्चा
आय मिरर
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली आहे.नागपूर या ठिकाणी गारटकर यांनी मंत्री गडकरी यांची भेट घेत झाली.
मात्र ही भेट केवळ मैत्रीपूर्वक संबंधातून होती. प्रदीप गारटकरांच्या गेल्या 30-35 वर्षापासून च्या राजकीय कारकिर्दीत त्यांचे अनेक हिंदुत्ववादी संघटनांशी सलोख्याचे संबंध आहेत. गारटकर यांच्या राजकारणाची सुरुवातही पतीत पावन या हिंदुत्ववादी संघटनेपासून झाली. आजपर्यंतच्या कार्यकाळात त्यांचे अनेक हिंदुत्ववादी नेत्यांची जवळचे संबंध आले आणि गारटकर यांनी ते सातत्याने जपण्याचे काम केलं.
राजकीय पक्ष वेगवेगळे असले तरी मैत्रीचा सलोखा कायम जपला पाहिजे यास प्रदीप गारटकर यांनी नेहमीच प्राधान्य दिले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी झालेली भेट हे देखील त्याचाच एक भाग आहे.
भेटीत विकास कामांवर चर्चा...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ही भेट प्रेरणादायी होती अशी प्रतिक्रिया प्रदीप गारटकर यांनी या भेटीनंतर प्रसारमाध्यमांना दिली आहे.या भेटीदरम्यान विविध विकास कामांबाबत चर्चा झाली, पायाभूत सुविधांमधील सुधारणा, नागरी सुविधा, रस्ते व महामार्ग यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर ही सविस्तर चर्चा झाली.त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी केलेले कार्य, त्यांच्या योजनांची अंमलबजावणी आणि कार्यपद्धती नेहमीच प्रेरणादायक वाटते. असं जिल्हाध्यक्ष गारटकर यांनी म्हटलं आहे
तर मंत्री नितीन गडकरी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभते आणि त्यांचे मार्गदर्शन हे नेहमीच एक प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारी अनुभूती असते त्यांच्याकडून मिळणारे विचार आणि धोरणात्मक देश आहे आगामी काळात समाज उपयोगी कामासाठी निश्चित उपयोगी ठरेल असेही गारटकर यांनी म्हटलं आहे.
What's Your Reaction?