पुरंदर तालुक्यातील जेऊर फाट्यावरील रेल्वेच्या अंडरपास पुलाचे काम चार दिवसातच खराब

Feb 10, 2025 - 17:51
Feb 10, 2025 - 18:12
 0  38
पुरंदर तालुक्यातील जेऊर फाट्यावरील रेल्वेच्या अंडरपास पुलाचे काम चार दिवसातच खराब

आय मिरर (राहुल शिंदे)

पुरंदर तालुक्यातील लोहमार्गावर अनेक ठिकाणी अंडरपास पुल बांधण्यात आले आहेत. मात्र या पुलांबाबत अनेक तक्रारी पुढे येत असून जेऊर वीर या गावाकडे जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या अंडरपास पुलाचं बांधकाम हे निष्कृष्ट दर्जाच असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.या पुलात पाणी साठत असल्याने अनेक ठिकाणी खड्डे पडून वाहनांचे अपघात होत आहेत. रेल्वे खात्याने मागील महिन्यात या ठिकाणी दुरुस्तीचे काम केले असून पाच दिवसापूर्वीच हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असताना पुन्हा या ठिकाणी पाणी साठत असून खड्डे पडायला सुरवात झाली आहे.चारच दिवसात दुरुस्त केलेला रस्ता खराब होऊ लागल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाचा निषेध केला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow