बिग ब्रेकिंग | भिगवणला बेंगलोर दिल्ली एक्सप्रेस आंदोलकांनी रोखून धरली
आय मिरर(विजयकुमार गायकवाड)
कोरोना काळापासून भिगवण रेल्वे स्थानकावरील एक्सप्रेस गाड्यांचा थांबा बंद करण्यात आला असून तो पूर्ववत चालू करावा या मागणीसाठी मंगळवार ( ता.२७) रोजी भिगवण आणि परिसरातील रेल्वे प्रवासी व नागरिकांनी बंगलोर दिल्ली एक्सप्रेस १५ मिनिटे रोखून धरली.
रेल्वे प्रबंधक फारूक शेख यांनी आपल्या मागणीचे निवेदन वरिष्ठांना कळवून यावर तोडगा काढू अशा प्रकारचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले .
यापूर्वी थांबत असलेल्या हैदराबाद एक्सप्रेस ,चेन्नई एक्सप्रेस, सिद्धेश्वर विजापूर या प्रमुख गाड्यांचा थांबा सुरू करून हुतात्मा एक्सप्रेस पुणे लातूर,पुणे अमरावती,उद्यान एक्सप्रेस या गाड्यांना देण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
पुणे सोलापूर अहमदनगर या तीन जिल्ह्याच्या सीमेवर भिगवण हे मध्यवर्ती रेल्वे स्थानक आहे. त्यामुळे या तीन जिल्ह्यातून शासकीय शैक्षणिक औद्योगिक नोकरीच्या कामानिमित्त पुणे व सोलापूर या जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांची तसेच भिगवणजवळील पाणलोट क्षेत्रात परदेशी पक्षी येत असल्याने ते पाहण्यासाठी देश विदेशातून पर्यटक येत आसतात. रेल्वे स्थानकाला थांबा नसल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाला वारंवार पत्र व्यवहार करूनही रेल्वे प्रशासने दखल न घेतल्यामुळे हे रेल रोको आंदोलन केले असून लवकर या रेल्वे स्थानकांचा व पूर्ववत चालू न झाल्यास यापेक्षाही मोठे आंदोलन केले जाणार असल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले.
यावेळी कर्मयोगी कारखान्याचे संचालक पराग जाधव मा.जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, सचिन बोगावत,सामाजिक कार्यकर्ते रमेश बाबा धवडे , तानाजी वायसे,मिलिंद जगताप, कपिल भाकरे, सुरेश बिबे, जुबेर शेख,विठ्ठल मस्के, कुमार काळे,शितलकुमार हगारे,आदी सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच परिसरातील गावाचे सरपंच, प्रवासी ,रिक्षाचालक माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुठलाही अनुचित प्रकार घडु नये म्हणून पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
What's Your Reaction?