सराईत गुन्हेगार आणि पोलिसांचा यवतमध्ये थरार...चौघांना ठोकल्या बेड्या ; वाचा संपूर्ण थरारक घटना
आय मिरर
पुण्याच्या यवत पोलिसांनी केडगाव चौफुला परिसरात दहशत निर्माण करू पाहणाऱ्या सराईत गुन्हेगाराला आणि त्याच्या साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत. यवत पोलिसांनी त्यांच्याकडून काही घातक हत्यारे देखील ताब्यात घेतले आहेत. आदिनाथ ईश्वर गिरमे,महेश मनोज दुर्बे, महेश उर्फ मन्या संजय भागवत आणि पृथ्वी अशोक खंडाळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून हे चारही आरोपी दौंड तालुक्यातील आहेत.यातील महेश उर्फ मन्या संजय भागवत हा यापूर्वी दुहेरी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून तो सध्या जामीनावर मुक्त होता.
यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.०५ नोव्हेंबर रोजी रात्री पावणेबारा वाजता दौंड तालुक्यातील वरखंड गावामध्ये ग्रामदैवत नागेश्वर महाराज यात्रा उत्सवाचे अनुषंगाने पोलीस बंदोबस्त लावला होता.यावेळी यवत पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी सराईत आदिनाथ ईश्वर गिरमे हा मारूती कंपनीची स्विप्ट कार नंबर एम एच/४२/एच/६२४१ मधुन पुणे सोलापूर रोडने यवत येथुन पाटस मार्गे कुसेगाव बाजुकडे जाणार आहे अशी खात्रीशीर बातमी पो. हवा देवकर यांना मिळाली.
त्यानंतर यवत पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक महेश माने यांनी लागलीच डी.बी. स्टाफच्या मदतीने पाटस ब्रिजचे खाली पुणे-सोलापुर रोडचे सर्विस रोडला नाकाबंदी लावली.यावेळी पुणे बाजुकडुन येणाऱ्या वाहनांची झडती घेतली त्यावेळी १) महेश मनोज दुर्बे वय २२ वर्ष रा. फराटे गल्ली दौंड २) महेश उर्फ मन्या संजय भागवत वय २६ वर्ष रा. पाटस तामखडा ता. दौंड ३) पृथ्वी अशोक खंडाळे वय २३ वर्ष रा. इरीगेशन कॉलनी दौंड यांनी आपसात संगणमत करून पोलीसांना आरोपी आदिनाथ गिरमे हा पोलिसांच्या ताब्यात मिळु नये म्हणुन पोलीसांनी गाडी थांबविली असता त्यांच्या ताब्यातील चारचाकी कार पोलीसांना जिवे मारण्याचे उद्देशाने अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. आणि ते सुपा बाजुकडे भरधाव वेगात निघुन गेले.
त्यानंतर सदर कारचा व त्यातील पोलिसांना हवा असणारा आरोपीचा शोध घेत असताना पोलीस पथकाला कूसेगावच्या हद्दीत पाटस सुपा रोडच्या पश्चिम बाजूला एक कार अपघात होवुन पलटी झाल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी सदर ठिकाणी जावून कारची पाहणी केली असता सदर कारमध्ये हवा असणारा आरोपी आदिनाथ ईश्वर गिरमे त्याचे साथीदार आणि कारच्या डिकीमध्ये दोन लोखंडी कोयते आणि लाकडी दांडके मिळून आली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले त्यानंतर त्यांच्यावर वरंवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधोपचार करण्यात आले.
घडलेल्या संपूर्ण प्रकरणी यवत पोलिसांनी पो. हवा. देवकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून यवत पोलीस स्टेशन मध्ये विविध कलमान्वये व भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ सह मो.वा.का. कलम १८४, १७९ अन्वये गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली आहे.तरी सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज हे करित आहेत.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, आपण पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहा.पोलीस निरीक्षक महेश माने,पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज,पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे,पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण गाडेकर,स.फौ.महेंद्र फणसे,स.फौ.राजीव शिंदे,पो.हवा. गुरुनाथ गायकवाड,संदीप देवकर,अक्षय यादव,महेंद्र चांदणे, रामदास जगताप,विकास कापरे,गणेश कुतवळ,जालिंदर बंडगर,मोहम्मदअली मड्डी,पो.कॉ. मारूती बाराते,हनुमंत खटके,प्रतिक गरूड,भारत भोसले,विनोद काळे,श्रीकांत माने,शुभम मुळे,सचिन काळे,मोहन भानवसे यांनी केली.
What's Your Reaction?