जखमी चित्रबलाकच्या मदतीला धावले ते चौघे ; वेळेत उपचार मिळाल्याने वाचले प्राण
आय मिरर
इंदापूर शहरातील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या मागील बाजुस झाडीत अडकून जखमी झालेल्या चित्रबलाक पक्षास युवकांनी जीवदान दिले.
सोमवारी (दि.17 ) शहरातील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या मागील बाजुला झाडीमध्ये एक चित्रबलाक नावाचा पक्षी जखमी अवस्थेत अडकला होता. त्यास पाहून पर्यावरण प्रेमी ऍड. आशुतोष भोसले,सद्दाम सय्यद, सोहेल सय्यद, वेदांत घोरपडे या युवकांनी त्या जखमी चित्रबलाक पक्षास शिफाईतिने सोडवून त्यास प्रथमोचार करुन त्या पक्षास इंदापूर परिक्षेत्र वन अधिकारी अजित सूर्यवंशी यांच्याशी संपर्क करून वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. जखमी पक्षाला पुढील उपचारासाठी बारामती इथे पाठवण्यात आले आहे.
याकामी युवकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्या जखमी चित्रबलाक पक्षास उपचार मिळल्याने त्याचा जीव वाचण्यास मदत झाली आहे.त्यामुळे युवकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अश्या प्रकारे कुठेही वन्य पशू, पक्षी हे जखमी अस्वस्थेत आढळून आलेस वनविभागास संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
What's Your Reaction?