महाराष्ट्राचा मान उंचावला ! जय भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या खेळाडूंचे राष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश
आय मिरर
छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या सब ज्युनियर राष्ट्रीय कुराश स्पर्धेत इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथील जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले.
या स्पर्धेमध्ये भारतातील सर्व राज्यातून 550 खेळाडू सहभागी झाले होते,यामध्ये महाराष्ट्रातून जवळपास 55 खेळाडू सहभागी झाले होते.यात पै.युद्धवीर गायकवाड याने 50 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला तर कु.पै.अण्वि गायकवाड 28 किलो वजनी गटात तृतीय क्रमांक मिळवला याशिवाय कु.पलक काळे,चि.रणवीर गायकवाड, कु.आरोही गायकवाड,चि.ज्योतिरादित्य गायकवाड, चि.आदिराज गायकवाड या खेळाडूंनी महाराष्ट्र संघाचे नेतृत्व केले.
या विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभागी होत इंदापूर तालुक्यातील जय भवानीगड विकास प्रतिष्ठानचे नाव संपूर्ण भारतभर करत राज्याचा नाव लौकिक केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले,उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले, सचिव हर्षवर्धन खाडे, मुख्य सल्लागार प्रदिप गुरव विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राजेंद्र सरगर यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या विद्यार्थ्यांना क्रिडा विभाग प्रमुख प्रशिक्षक शिवराज तलवारे ,अविनाश कोकाटे यांचे मार्गदर्शन लाभले यांचेही संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
What's Your Reaction?