इंदापूर : आय मिरर
पडस्थळ ( ता इंदापूर ) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत श्री कोटलिंगनाथ ग्राम विकास पॅनलने दणदणीत विजय मिळविला आहे.सरपंच पदासाठी वैशाली पांडुरंग मारकड व जिजा हनुमंत रेडके अशी दुरंगी लढत झाली. यामध्ये वैशाली पांडुरंग मारकड १०३ मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. तर सदस्य पदाच्या सात पैकी सहा जागी विजय मिळवत श्री कोटलिंगनाथ ग्राम विकास पॅनलने ग्रामपंचायतची निर्विवाद सत्ता काबीज केली आहे.
विद्या चंद्रकांत बोंगाणे, प्रियंका गणेश गव्हाणे, सपना राजेंद्र बोंगाणे, अश्विनी गोकुळ कोळेकर, बेगम दत्तू झेंडे, रेश्मा महेंद्र रेडके विजयी झाल्या आहेत.तर विरोधी गटाचे श्री कोटलिंगनाथ जनसेवा विकास पॅनलच्या रोहिणी प्रमोद काळे या एकमेव उमेदवार विजयी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना एका जागी समाधान मानावे लागले आहे.
पडस्थळ ग्रामपंचायत ची स्थापनेपासून पहिलीच निवडणूक झाली. यापूर्वी सर्व निवडणुका बिनविरोध होत होत्या त्यामुळे निवडणूक अत्यंत चुरशीची झाली.पक्षीय राजकारणाला फाटा देत स्थानिक आघाडी करून दोन्ही गटांनी निवडणूक लढवली. श्री कोटलिंगनाथ ग्रामविकास पॅनलच्या विजयासाठी पांडुरंग मारकड, हरिदास रेडके, सुग्रीव बोंगाणे, बळीकाका बोंगाणे, सुभाष बोंगाणे महेंद्र रेडके, भारत बोंगाणे, अमोल कोळेकर यांनी परिश्रम घेतले.