इंदापूर : आय मिरर
भरधाव वेगात निघालेले ट्रॅक्टर ट्राॅलीचा आणि समोरून येणाऱ्या दुचाकीचा अपघात झाला असुन या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला आहे.हा अपघात सोमवार दि.१४ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास भिगवण गावच्या हद्दीत भिगवण राशीन रोडवरती हॉटेल चांगभलं मच्छि खानावळचे समोर घडला आहे.मोहम्मद अबीद बहारुद्दीन अन्सारी वय 24 वर्ष रा. भिगवण असं मयत व्यक्तीचे नांव आहे.भिगवण पोलीसांत ट्रॅक्टर चालक अमोल संजीव नंदे, वय 28 वर्षे, सध्या रा.मांजरगाव ता.करमाळा जि. सोलापुर मुळ रा. जैनवाडी ता. चिकोडी जि. बेळ राज्य कर्नाटक या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महामार्ग पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार दि.१४ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास भिगवण राशीन रोडवरील हॉटेल चांगभलं मच्छि खानावळचे समोर अमोल संजीव नंदे हा त्याचे ताब्यातील बिगर नंबर चा ट्रॅक्टर दोन ट्रॉली सह हा भिगवण बाजूकडून राशीन बाजूकडे भरधावं वेगात घेऊन निघाला होता. याचवेळी त्याचे समोरून राशीन बाजूकडून भिगवण बाजूकडे येणारी युनिकॉर्न दुचाकी नंबर एम एच ४२ पी ७००० हिस जोराची धडक बसून अपघात झाला.
सदर अपघातात मोटार सायकल वरील मोहम्मद अबीद बहारुद्दीन अन्सारी वय 24 वर्ष रा. भिगवण याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यास तात्काळ तक्रारवाडी येथील लाईफ लाइन हॉस्पिटल मध्ये उपचारकामी दाखल केले. मात्र चारच्या सुमारास उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
तर त्याचे सोबत असणारा मोटार सायकल वरील त्याचा सहकारी सोहेब अख्तर अन्सारी यास डोक्यास व हाता पायास गंभीर मार लागलेला आहे.अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उप निरीक्षक धर्मपाल सांगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.