इंदापूर : आय मिरर
महाराजा यशवंतराव होळकर यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने इंदापूर तालुक्यातून शंभर गावामध्ये उद्यापासून घोंगडी बैठकीला सुरवात करुन धनगर आरक्षणाच्या लढाईला आम्ही सुरवात करीत असल्याचे धनगर ऐक्य परिषदेचे अध्यक्ष डाॅ.शशिकांत तरंगे यांनी म्हटले आहे.
सत्तर वर्षात धनगर समाजाला सर्वांनी फसवलं आता निर्णायक लढाईची वेळ आली आहे. ति निर्णायक लढाई इंदापूर तालुक्यातून आम्ही सुरु करित आहोत.जोपर्यंत समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही.धनगरांचे हे उग्र स्वरूपातील आंदोलन राज्यात सुरु होईल अवघा महाराष्ट्रात ते बघेल असं ही डाॅ.शशिकांत तरंगे यांनी म्हटले आहे.
इंदापूर शहरातील शासकीय विश्रामगृहाच्या ठिकाणी शुक्रवारी दि.२८ आँक्टोबर रोजी धनगर आरक्षणाच्या मुद्यावर समाजातील विविध पक्षातील नेत्यांची एकत्रीत बैठक पार पडली.समाजाच्या आरक्षणासाठी काही महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले. यावेळी डाॅ.तरंगे बोलत होते.
या बैठकीला दिलीप पाटील,सिताराम जानकर,विष्णू पाटील, मोरेश्वर कोकरे,नानासाहेब खरात,आप्पा माने ,तुकाराम करे,कुंडलिक कचरे,संजय रुपनवर,विशाल मारकड,श्रीनिवास सातपुते,लक्ष्मण देवकाते आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.
गावागावातला प्रत्येक धनगर बांधव या लढ्यात सहभागी करुन घेण्यासाठी आम्ही गावागावात जाऊन प्रत्येकाला तयार करित आहोत.महाराष्ट्रात गेल्या सत्तर वर्षापासून ज्या धनगर समाजाला प्रत्येक राजकीय पक्षाने आश्वासित केले.खतासाठी धनगर समाजाचा वापर केला.त्या प्रत्येक राजकीय पक्षाच्या बाबतीत धनगर समाजाच्या मनामध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे.महाराष्ट्रातील कोणताही पक्ष धनगर समाजाला न्याय देऊ शकतो अशी भावना धनगर समाजाच्या मनामध्ये उरलेली नाही.धनगर समाजाला या महाराष्ट्रात पुन्हा एकदा आरक्षणाचा लढा पुकारण्यासाठी १३ सप्टेंबर ला केंद्र सरकारने देशातील पाच राज्यात अनुसूचीत जमातीच्या सवलती लागू करण्यासाठी त्या त्या राज्यातील बारा समाजाचा ज्यामध्ये काना मात्रा वेलांटी अनुस्वार किंवा इंग्रजी शब्दातील दुरुस्ती करुन त्या त्या समाजाला त्या त्या राज्यात अनुसूचीत जमातीच्या सवलती लागू करण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला.आम्हाला त्याचा आनंद आहे परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रात असणाऱ्या धनगर समाजाच्या “र” आणि “ड” चा प्रश्न इतर राज्यांतील दुरुस्तीप्रमाणेच आहे.तो सुध्दा केंद्र सरकारने दुरूस्त करुन महाराष्ट्रातील धनगर समाजाला न्याय द्यावा अशी आमची भूमिका असल्याचे डाॅ.तरंगे यांनी सांगितले आहे.