“आता तालुक्याचे आमदार म्हणत आहेत की वीज जोडणी पुरवत न झाल्यात रस्त्यावर उतरू. त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात 6 वेळा वीज तोडली होती. त्यावेळी मात्र ते मूग गिळून का गप्प का होते.” – तालुकाध्यक्ष अँड.शरद जामदार
इंदापूर : आय मिरर
इंदापूर तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत चालु करावा व वीज तोडणी मोहीम तात्काळ बंद करावी, या मागणीचे निवेदन इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांना ऊर्जा भवन बारामती येथे शुक्रवारी (दि.10) देण्यात आले. तसेच भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्य अभियंत्याशी चर्चा केली. दरम्यान, याप्रसंगी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही मुख्य अभियंता सुनील पावडे यांचेशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
वीज वितरण कंपनीने शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे, परिणामी शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. त्यामुळे शेती पंपांचा वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत सुरु करावा या मागणीसाठी इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुकाध्यक्ष अँड.शरद जामदार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्य अभियंत्यांची भेट घेतली.
यावेळी चर्चेदरम्यान अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. तसेच यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले की, वरिष्ठ पातळीवरती मी बोलणार असून निश्चितपणे यातून मार्ग निघेल. यावेळी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांनी तालुक्यामध्ये काही भागात उच्च दाबाने वीजपुरवठा होत नसल्याने सब स्टेशनला ट्रान्सफॉर्मची कॅपॅसिटी वाढवून उच्च दाबाने वीजपुरवठा करण्याची मागणी केली.
याप्रसंगी निरा भिमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उदयसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, तानाजी थोरात, दूध संघाचे अध्यक्ष उत्तम जाधव, अरविंद जगताप, स्वप्निल सावंत, दादासाहेब घोगरे, तेजस देवकाते, माऊली चवरे, गजानन वाकसे, आकाश कांबळे, माऊली मारकड, विक्रम कोरटकर, हनुमंत काजळे, अंबादास शिंगाडे, सुभाष काळे, सचिन सावंत, पवन घोगरे, राहुल पाटील, बाळासाहेब पानसरे, बापू लाळगे, स्वप्निल घोगरे आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.