इंदापूर || सेव्ह द चिल्ड्रन – बाल रक्षा भारत ही संस्था भारतामध्ये एकुण 17 राज्यात बालकांच्या हक्क व अधिकारावर व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करते. कोविड १९ परिस्थितीमध्ये भारत देशामधील परिस्थितीत सुधारणा व्हावी. भारतीय नागरिकांचे जनतेची कोरोना महामारीतुन लवकरात लवकर सुटका व्हावी. तसेच देशाच्या आरोग्य यंत्रणेवरील वाढता ताण कमी होणे कामी संस्थेमार्फत देशातील विविध ठिकाणी यांत्रिक उपकरणे वाटपाचे कार्य हाती घेण्यात आला आहे.शनिवार दि.29 रोजी इंदापूर पंचायत समिती आरोग्य विभागास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते काही साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तहसीलदार अनिल ठोंबरे,गटविकास अधिकारी विजयकुमार परिट, संस्थेचे प्रकल्प अधिकारी हनुमंत पवार यांसह विविध अधिकारी उपस्थित होते.
सेव्ह द चिल्ड्रन संस्थेमार्फत ऑस्ट्रेलिया मधुन ५०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मागविण्यात आले होते व ते सर्व ५०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मुंबई विमानतळावरून देशातील विविध राज्यात एकूण ३९ शहरात पोहविण्यासाठी संस्थेचे काम चालु आहे. संस्थेच्या महाराष्ट्र राज्याच्या वरिष्ठ व्यवस्थापिका श्रीमती. इप्सिता दास यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील आरोग्य विभागाला लागणारे यांत्रिक उपकरणे, औषधे, सर्जिक साहित्याचे वितरण करण्यात येत आहे.
कोरोना माहामारीमुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील झोपडपट्टीतील व ग्रामीण भागात आर्थिक अडचणीत सापडलेल्या जनतेला अन्न धान्य वाटप, वैयक्तिक कौटुंबिक स्वच्छतेसाठी किशोरवयीन मुली, गर्भवती माता, स्तनदा माता यांना स्वच्छता किट (हायजिन किट) वाटपाचे काम संस्थेचे मार्फत मागील वर्षी कोवीड माहामारीमध्ये वाटप केले होते व ते या ही वर्षी वाटपाचे कार्य संस्थेमार्फत केले जाणार आहे. तसेच कोरोना माहामारीमुळे मुलाच्या शिक्षणात खंड पडलेला आहे परंतु बालके शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडू नये म्हणुन संस्थेमार्फत संस्थेचे विविध प्रकल्प जा कार्यक्षेत्रात चालू आहे त्या कार्यक्षेत्रातील बालकांना संस्थेमार्फत एज्युकेशन किट लर्निंग कीट चे लवकरच वाटप करण्यात येणार असल्याचे अससिस्टंट मॅनेजर अपर्णा जोशी यांनी सांगितले.