इंदापूर : आय मिरर
पुणे जिल्ह्यात ऐतिहासिक नगरी म्हणून इंदापूर शहराची ओळख आहे.हे शहर दिवसेंदिवस व्यापाराच्या दृष्टीने सक्षम होत असून अनेक व्यवसाय जोमाने उभे राहताहेत. यात सर्वात मोठी बाजारपेठ ही केवळ वस्त्रदालनाने व्यापली आहे. यात शहरातील शहा ब्रदर्स अँन्ड कंपनीचं नांव अग्रक्रमाने घेतले जाते.

सण उत्सवाच्या काळात वस्त्र खरेदीसाठी इंदापूसह आसपासच्या तालुक्यातील ग्राहकांची पहिली पसंती ही इंदापूर शहरातील मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या शहा ब्रदर्स अँड कंपनीला असते. मागील अनेक दशकांपाशून इंदापूर शहरात हे दालन उभे आहे.शहा ब्रदर्सची चौथी पिढी आता हा व्यवसाय जोमाने सांभाळतेय. त्यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केला असून तालुक्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन म्हणून शहा ब्रदर्सने नावलौकिक मिळवला आहे.
कोरोना महामारीमुळे अनेक दिवसांपासून काहीसे थंडावस्थेत असणारे विवाहसोहळे आता पुन्हा एकदा जोमाने पार पडताहेत. देण्या-घेण्याच्या साड्यांपासून वधूवरांचे सुंदर कपडे आणि असंख्य प्रकारच्या साड्या त्यातही पैठणीसारखं महावस्त्रदालन म्हणजे इंदापूरातील “राधाकमल साडीज”
यावर्षी दिपावली हा उत्सव आपण सर्वजन मोठ्या आनंदाने साजरा करीत आहोत.दुख:चे क्षण बाजूला सारून सर्वच जन उत्साह आणि चैतन्याने हा उत्सव साजरा करत आहेत.बाजारपेठा सजल्या असून ग्राहकांची मोठी रेलचेल मुख्य बाजारपेठेत पहायला मिळातेय. तालुक्यातून अनेक नागरिक गुणवत्तापूर्ण वस्त्र खरेदीसाठी अत्याधुनिक अश्या शहा ब्रदर्स दालनात विश्वासाने येताहेत. वाजवी किंमत व टिकाऊ वस्त्रांमुळे शहा ब्रदर्स ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.
शहा ब्रदर्स आणि कंपनीच्या अत्याधुनिक दालनात अनेक व्हरायटीज या एकाच ठीकाणी एकाच छताखाली पाहायला मिळतात त्यातुन आपल्या पंसदीचे वस्त्रे घेण्याकडे ग्राहकांचा कल असतो.दीपोत्सवा निमित्ताने छान छान आकर्षक कपड्यांच्या खरेदी साठी महिलावर्ग बाहेर पडतोय. आपल्या ग्राहकांच्या पसंतीला उतरतील अशा वैशिष्ट्येपूर्ण कपड्यांनी शहा ब्रदर्स अँण्ड कंपनीचं दालन सज्ज झालेय. वधु-वरांचा संपुर्ण पोशाख, संपुर्ण लग्न बस्ता, सुटींग-शर्टीग, किड्स वेअर, रेडीमेड लेडीज वेअर, जेन्टस-लेडीज होजिअरी, सर्व प्युअर सिल्क साडया, काटपदर, पैठणी, शालु अशा अनेक वैविध्यपूर्ण वस्त्रांनी सजलेलं हे दालन हजारो नाही तर लाखो ग्राहकांच्या पसंतीला उतरलेलं आहे.तरूण पिढीला साड्या आणि ड्रेस मटेरियल व्यतिरिक्त वेस्टर्न वेअरचे आकर्षण आहे. सणासमारंभाला ठेवणीतल्या साड्या आणि पंजाबी ड्रेस वापरणार्या नव्या पिढीला जीन्स, टी शर्ट्स आणि अन्य आधुनिक वेस्टर्न वेअर्सच्या भरपूर व्हरायटीज रास्त किंमतीत उपलब्ध आहेत.