इंदापूर : आय मिरर
मागील दोन, तीन वर्षांचा काळ बघितला तर कोवहीड संसर्गामुळे समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.आपण आपल्या लहान मुलांना तसेच वृद्ध पालकांना या रोगाचा संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेत होतो.
अशामध्येच अनेक जणांना कोव्हीड सारखा दुर्धर आजार होऊन गेला अनेक रुग्णांचा या आजाराने घात केला अनेक रुग्ण डॉक्टरांच्या अथक परिश्रमामुळे या आजारातून सुखरूप बाहेर देखील पडले.लहान मुलांमध्ये या आजाराची लक्षणे जास्त तीव्र प्रमाणात आढळली नाहीत त्यामुळे आपण सर्वजण समाधानी होतो. परंतु कोह्वीड झाल्यानंतर साधारण तीन आठवड्यापासून तीन महिन्यांपर्यंत किंवा त्यानंतरही पोस्ट कोव्हीड सिंड्रोम PMIS नावाचा अत्यंत गंभीर आजार हा कोह्वीड झालेल्या लहान मुलांमध्ये बघायला मिळत आहे.

या आजाराच्या नावानुसारच हा लहान मुलांमधील आजार आहे व कोह्वीडच्या इन्फेक्शन मुळे शरीरामध्ये ऑटो इम्युनिटी AUTO IMMUNITY तयार होते त्याचे फलितस्वरूप म्हणून त्या बालकाच्या शरीरातील विविध अवयवांमध्ये निर्माण होणारा हा दोष आहे. या आजारामध्ये एक पेक्षा जास्त अशा अवयवांमध्ये, शरीरातील संस्थांमध्ये दोष तयार होतो त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे लहान मुलांमध्ये निर्माण होता जसे की – अत्यंत जास्त प्रमाणात डोके दुखणे डोळे दुखणे व डोळे लाल होणे पोटामध्ये चमका येणे किंवा क्रॅम्प्स येणं
बाळ हे सुस्त राहणे, झोप येणे झटका येणे,पायावर सूज येणे किंवा लघवी कमी होऊन किडनीवर सूज येणे याबरोबरच काही लहान मुलांमध्ये हृदयाचे आजार ही या रोगामध्ये आढळून आलेले आहेत यामध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यांना सूज येणे हृदयाचे व्हॉल्व्ह खराब होणे ही सर्वसाधारण लक्षणे आढळतातच पण एक प्राथमिक स्वरूपाचे लक्षण म्हणजे अतिशय तीव्र प्रकारचा ताप जो कुठल्याही औषधांना रिस्पॉन्स करत नाही. १०३- १०४ डिग्री चा चार ते पाच दिवसांचा पेक्षा जास्त काळ राहणे हे सर्वात प्राथमिक स्वरूपाचे लक्षण या आजारामध्ये दिसून येते
मागील काही महिन्यांमध्ये आपल्या इंदापूर तालुक्यांमध्ये सुद्धा या प्रकारची लक्षणे असलेली अनेक मुले आम्हास दिसून आलेले आहेत तसेच या आजाराचे निदान करून त्यांना योग्य ट्रीटमेंट वेळेत मिळाल्यास या दुर्धर आजारातून बालक हे निश्चितपणे बरी होतात.
निदान — या आजाराचे निदान करण्यासाठी C.B.C., C.R.P., SR. FERITIN, D DIMER, 2 D ECHO या तपासण्या करणे गरजेचे असते. सर्वसाधारणपणे या तपासण्यांमध्ये लेव्हल ही वाढलेली असते यातूनच शरीरामध्ये इन्फेक्टिव्ह प्रोसेस चालू आहे व तीव्र प्रमाणात वाढत आहे याचा अंदाज आपल्याला येतो.
उपचार — हा दुर्धर आजार असल्याने या बालकांना आयसीयूमध्ये म्हणजेच P.I.C.U. मध्ये अॅडमिट करून त्याच्या सर्व लक्षणांवर निगराणी ठेवणे अत्यंत आवश्यक आसते.बाळास सलाइन लावून त्याच्या शरीरातील द्रवांश म्हणजेच पाण्याचे प्रमाण व्यवस्थित ठेवणे,
मीठ साखरेचे म्हणजेच इलेक् ट्रोलाइटसचे प्रमाण व्यवस्थित ठेवणे, बाळाचे बीपी व्यवस्थित आहे का तसेच हृदयाचे ठोके नीट पडत आहेत का व त्यानुसार औषधोपचार करणे हे प्राथमिक ट्रीटमेंट ठरते.मेन ट्रीटमेंटमध्ये या बालकांना हायडोसमध्ये इम्युनोग्लोबुलिनचा high dose immunoglobulins- 2 mg per kg वापर करावा लागतो.तसेच हृदयावर ती किंवा हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर जर सूज आलेली असेल तर या रुग्णांमध्ये इकोस्प्रिन ecosprin व लो मॉलिक्युलर वेट हिपॅरीन lowolicular weight heparin या औषधांचा वापर दीर्घकाळासाठी करावा लागतो.
या आजारामध्ये सातत्याने हृदय किडनी लिव्हर व मेंदू या अवयवाचे कार्यक्षमतेवर ती विविध प्रकारच्या तपासण्यांद्वारे लक्ष ठेवावे लागते. हृदयासाठी त्या दर महिन्यांला टू डी इको 2 D Echo नावाची तपासणी करावी लागते .तसेच मेंदूसाठी लिव्हर किडनीसाठी रक्ताच्या तपासण्या या दर महिन्याला करणे गरजेचे राहाते. योग्य वेळेत निदान झाल्यास तसेच योग्य व सर्वसोयीनियुक्त असणार्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होऊन त्याला तातडीने योग्य प्रकारची ट्रीटमेंट मिळाल्यास ही बालके या दुर्धर आजारातून सहजासहजी रोगमुक्त होतात.
सर्व पालकांसाठी आजचा संदेश एकच आहे की आपल्या बालकास जर यापैकी कोणतीही लक्षणे तसेच कडक स्वरुपाचा ताप दोन तीन दिवसांच्या वर राहत असेल तर त्वरित आपल्या जवळच्या बालरोग तज्ज्ञांना दाखवून या दुर्धर आजाराविषयी चौकशी करावी तसेच तपासण्या करून त्याची खातरजमा करून घ्यावी.
गोरे हॉस्पिटल इंदापूर हे सर्वसोयीनीयुक्त एन.आय. सी .यू . NICU व पी .आय. सी. यू. PICU असल्याने यासारख्या दुर्धर आजारांची उत्तम प्रकारे काळजी व उपचार येथे होतो.
गोरे हॉस्पिटल – इंदापूरमधील जनतेसाठी एक वरदान.…
- दर्जेदार स्त्रीरोग, प्रसूती विभाग तसेच बालरोग विभाग एकत्र असलेले इंदापूर तालुक्यांमधील एकमेव हॉस्पिटल.
- नॅशनल अँक्रिडेशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल म्हणजेच एन.ए.बी.एच. सारख्या नामांकित गुणवत्ता प्रदान करणाऱ्या कंपनी द्वारे प्रमाणित हॉस्पिटल.
- अनेक नामवंत कंपन्यांची कॅशलेस सेवा उपलब्ध असलेले इंदापूरमधील एक अग्रगण्य हॉस्पिटल.
- अत्यल्प दरात दर्जेदार सेवा देण्यास कटीबद्ध असलेले हॉस्पिटल.
- कोरोना काळात निरोगी बालपण या योजनेअंतर्गत हजारो बालकांना मोफत सेवा देणारे हॉस्पिटल.
- आता अत्याधुनिक उपकरण व सेवांसहित आपल्या सेवेस उपलब्ध