“शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिनांक 17 आणि 18 रोजी राज्यात ऊसतोड बंद आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने आज दिनांक 17 नोव्हेंबर रोजी पूर्ण गाळप व ऊस तोड बंद ठेवली आहे. मात्र हे लाक्षणिक आंदोलन आहे दोन-दोन दिवस तोडणी गाळप बंद राहिले तर ऊस तोड मजूरांच्या अडचणी होती,ते जर माघारी फिरले तर यात वाहन मालक आणि कारखान्याचे नुकसान होईल.आज जरी कारखाना गाळप बंद ठेवले असले तरी शेतकऱ्याचा ऊस शेतात वाळत आहे.त्यामुळे यात त्यांचही मोठ नुकसानं होतेयं.” – प्रशांत काटे, अध्यक्ष श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर
इंदापूर : आय मिरर
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राज्यभरात आज आणि उद्या ऊस तोड बंद आंदोलन पुकारलयं.त्यास इंदापूर तालुक्यात सकारात्मक प्रतिसाद मिळत असून तालुक्यातील कारखान्यांनी या आंदोलनास आपला पाठिंबा दर्शवलाय. भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने आज सकाळपासून गाळप बंद ठेवलयं.तर तालुक्यातील कारखान्यांनी ऊसाच्या तोडी बंद ठेवल्यात.
आपल्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ७ नोव्हेंबर ला पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता.यावेळी सरकारने निर्णय न केल्यास दि. १७ व १८ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ऊस तोड बंद आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांनी दिला होता.त्यानुसार आपल्या विविध मागण्यांकडे केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज आणि उद्या हे ऊस तोड बंद आंदोलन करण्यात येतयं असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम यांनी सांगितले आहे.
सन २०२१-२२ हंगामात गाळपास गेलेल्या उसासाठी एफआरपी अधिक २०० रुपये अंतिम भाव मिळावा. अशी मागणी राजू शेट्टी यांनी संघटनेच्या माध्यमातून केली आहे.राज्य सरकारने त्यासाठी ऊस दर नियंत्रण समिती स्थापन करुन आरएसएफ प्रमाणे येणारा भाव देण्यासाठी साखर कारखान्यांना आदेश द्यावेत अशी ही मागणी करण्यात आलीय.
राज्य सरकारने एफआरपी चे दोन तुकडे करण्यासाठी ऊस दर नियंत्रण अद्यादेशामध्ये केलेली दुरुस्ती त्वरीत मागे घ्यावी.येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात पुन्हा दुरूस्ती करुन एकरकमी एफआरपी देण्याचा कायदा करावा. तोपर्यंत साखर कारखान्यांनी गेल्या बर्चीच्या सरासरी उताऱ्याच्या आधारावर यावर्षी च्या सीझन मध्ये एकरकमी एफ आर पी द्यावी.ऊस तोडणी मजूर हे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे महामंडळामार्फतचं मजूर पुरवावेत.जोपर्यंत हा निर्णय होणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्याच्या बिलातून अथवा कारखान्याकडून महामंडळाने वर्गणी वसुल करु नये. यांसह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.