इंदापूर : आय मिरर
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर वाद चिघळला आहे.यावर महाविकास आघाडीमधील माजी मंत्री इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे दत्तात्रय भरणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.यामध्ये कोणीही राजकारण आणू नये कर्नाटक कर्नाटकच्या ठिकाणी बरोबर आहे तर महाराष्ट्र हा महाराष्ट्राच्या ठिकाणी बरोबर आहे. ज्या महाराष्ट्रातील काही नागरिकांनी वेगळे भाष्य केलेलं आहे.मात्र त्यांना काही सुविधा मिळत नाहीत म्हणून त्यांनी ते भाष्य केलयं. सरकारने त्यांच्या भावनांचा आदर करुन सुविधा द्याव्यात असं राष्ट्रवादीचे नेते आमदार दत्तात्रय भरणे यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इंदापूर शहरात शरद कृषी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार दत्तात्रय भरणे यांनी वुधवारी ०७ डिसेंबर रोजी या ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे याप्रसंगी त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य सचिन सपकळ,तालुका कृषि अधिकारी भाऊसाहेब रुपनवर, नगरसेवक अमर गाडे,गजानन गवळी,पोपट शिंदे,अनिकेत वाघ,राहुल गुंडेकर,अनिल राऊत,संदेश देवकर,संजय देवकर,संजय रुपनवर,वसिम बागवान, ओंकार सरडे आदी उपस्थित होते.