इंदापूर : आय मिरर
गुजरात निवडणूकीतील विजयानंतर भाजप कडून आज गुजरात मध्ये दिवाळी साजरी केली जात असतानाचं महाराष्ट्रात देखील भाजप कार्यकर्ते जल्लोष साजरा करु लागले आहेत.भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पुणे जिल्ह्यातील बावडा या गावामध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हलगीच्या निनादात एकमेकांना पेढे भरवत फटाक्यांची आतिशीबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.
भारतीय जनता पक्षाला गुजरात राज्यातील निवडणूकीत मोठ यश मिळालं. त्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जल्लोष साजरा केला जात असताना महाराष्ट्रात देखील याचा आनंदोत्सव साजरा केला जात आहे. भाजपचे जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर तालुक्यातील बावडा गावी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बावडा बाजारतळात हलगीच्या निनादात तोफांची सलामी देत भाजपाचा ध्वज फडकवला आहे. भारत माता की जय, वंदे मातरम्, भारतीय जनता पार्टीचा विजय असो गुजरात तो झाकि है महाराष्ट्र तो बाकी है अशी घोषणाबाजी करण्यात आली. एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा करण्यात आला.
यावेळी भाजप युवा मोर्चाचे सचिन सावंत, शरद गायकवाड, दादासाहेब कांबळे, मुजमीर तांबोळी,अब्दुल शेख,दर्शन गायकवाड, चिंतामणी गायकवाड,विजय गायकवाड,दत्ता कोळी, नितीन जाधव, शिवाजी गायकवाड आदी उपस्थित असल्याचं सचिन सावंत यांनी सांगितले आहे.