इंदापूर तालुक्यात शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करत असताना अशा प्रकारच्या घटना या निंदनीय आहेत. घटना समजताच चौकशी समिती स्थापन केली असून तात्काळ याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवणार आहेत. – विजयकुमार परीट,गटविकास अधिकारी
इंदापूर : आय मिरर
इंदापूर तालुक्यातील चाकाटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी आपापसात हाणामारी व एकमेकाला आरेकारेची भाषा केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळी घडली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियात प्रचंड वायरल होतोय.विशेष म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांसमोर हा प्रकार घडलाय. संस्काराचे धडे देणाऱ्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोरचं गैरवर्तन करत एकमेकांना आरे कारेची भाषा केल्याने विद्यार्थ्यांना शिक्षा करणाऱ्या या शिक्षकांना आता कोण शिक्षा करणार असा सवाल पालकांना पडलाय. सदर शिक्षकांवर तात्काळ बदलीची कारवाई करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावं अशी मागणी आता पालकांनी इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
या प्रकारानंतर पालक स्वस्थ बसले नाहीत.त्यांनी निवेदन तयार केले.त्यावर इतर पालकांच्या सह्या घेतल्या.गट शिक्षण अधिका-यांना निवेदन दिले.या शिक्षकांमध्ये वारंवार वादविवाद होतात. हाणामारी होते.त्यामुळे पाल्यांचे खुप मोठे नुकसान झाले आहे.पाल्यांना शाळेच्या अभ्यासक्रमातील काहीही येत नाही.त्यामुळे या दोन्ही शिक्षकांची तातडीने बदली करण्यात यावी.नवीन शिक्षक येईपर्यंत आम्ही सर्व जण शाळा बंद करीत आहोत ,असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनाखाली ३५ पालकांच्या सह्या आहेत.