इंदापूर : आय मिरर
केंद्र सरकार कडून राष्ट्रीय गोकुळ मिशन योजने अंतर्गत रोजगार निर्मिती करण्याकरिता ५० लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासाठी ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे.२०१४ पासून ही योजना राबवण्यात येतेय परंतु आजपर्यंत ५-६ वर्षात ती किती यशस्वी झाली ? असा प्रश्न उपस्थित करीत जोपर्यंत देशी जनावराबरोबचं विदेशी गायींचा समावेश या योजनेत होत नाही तोपर्यंत ही योजना सफल होणार नसल्याचं पुणे जिल्हा शेतकरी सुकाणू समितीचे जिल्हाध्यक्ष अँड.श्रीकांत करे यांनी म्हटले आहे.
करे म्हणाले की, देशी गायींचे दुग्धोत्पादन हे २ लिटर पासून ६ लिटर पर्यंत असते आणि विदेशी गायींचे दुग्धोत्पादन हे २० लिटर पासून ३० लिटर पर्यंत असते.त्यामुळे जर रोजगार निर्मिती करावयाची असेल तर विदेशी गायींचा ही कुठेतरी विचार करावा लागणार आहे.
हि योजना चांगली आहे त्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन करतो.मात्र या योजनेत विदेशी गायींचा जर समावेश केला तर ती आणखीन प्रभावी होईल.शेती हे सर्वात जास्त रोजगार देणारे क्षेत्र आहे.त्यामध्ये लाखो करोडो रोजगार निर्माण होतील.यासोबत पशुधनासाठी विमा देणाऱ्या कंपन्यांची संख्या मर्यादीत आहे.त्यावर ही सरकारने काम करावं असं ही करे यांनी म्हटले आहे.