इंदापूर : आय मिरर
ऊस पिकाची वाढ पूर्ण झाल्याने आणि हवामानातील बदलाने ऊस पिकाला तुरे आले आहेत यामुळे ऊसाच्या वजनात घट होणार आहे.त्यामुळे आपल्या उसाचे गाळप कधी होणार ही चिंता इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सतावत आहे.
अवकाळी पाऊस लागून राहिल्यामुळे साखर कारखान्यांना गाळपास जोर धरण्यास विलंब झाला. त्यामुळे आडसाली उसाच्या तोडी लांबल्या आहेत. इंदापूर तालुक्यात जवळपास 70 हजार एकरच्या आसपास क्षेत्र हे ऊस पिकाखाली असते.तालुक्यात तीन सहकारी आणि एक खाजगी साखर कारखाना आहे. साखर कारखान्याचे गाळप सुरु होऊन दोन महिन्यांचा काळ ओलांडला आहे.मात्र अनेक ठिकाणी आडसाली ऊस उभे असून तोड लांबल्यामुळे आणि पक्वता आल्याने व हवामानातील बदल यामुळे लागणीसह खोडावा ऊसास तुरे आले आहेत