आय मिरर
रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज येथील कृषी विद्या विभागाचे प्राध्यापक बंडोपंत शिंदे यांना नुकतीच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. प्राध्यापक बंडोपंत शिंदे यांनी 2019 मध्ये पीएचडीची प्रवेश परीक्षा पास होऊन डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे कृषी विद्या विभागात आचार्य पदवीसाठी प्रवेश घेतला होता.
या पदवीच्या कालावधी तीन वर्षाचा असून त्यांनी त्यांचे संशोधन व प्रबंध तीन वर्षाच्या आत मध्ये सादर केलेला आहे. सदर संशोधन हे विविध प्रकारच्या शेती पद्धती म्हणजेच नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, संवर्धित शेती व पारंपारिक शेती ही भात आधारित पीक पद्धतीत शाश्वत पद्धतीने कशा होते प्रकारे लावता येईल व शेतकऱ्यांसाठी कोणती पद्धती व पिके फायद्याचे आहेत त्याचप्रमाणे मातीची गुणवत्ता कशी वाढवता येईल यावर आधारित आहे. त्या साठी त्यांनी खरिफ मध्ये भात व रबी मध्ये भुईमूग, मधुमका, वांगी आणि कलिंगड या पिकांची निवड केली होती. त्यांना संशोधनासाठी मदत ही प्रमुख मार्गदर्शक शिक्षक वा शात्रज्ञ डॉ.यु व्ही महाडकर, विस्तारक संचालक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली हे लाभले होते, तसेच डॉ. पी. एस. बोडके, डॉ.एस. बी. दोडके व डॉ. व्ही. ए. थोरात यांचे मार्गदर्शन संशोधनाकरिता तसेच प्रबंध तयार करण्याकरता लाभले.
सदर प्रबंध सादर करण्यास सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक मा. जयसिंहजी मोहिते -पाटील साहेब तसेच संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, कु.स्वरूपाराणी मोहिते -पाटील यांचे सहकार्य लाभले.
संस्थेचे सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील,माजी प्राचार्य व समन्वयक डॉ. डी.पी.कोरटकर, प्राचार्य आर. जी. नलवडे, प्रा.एस एस भोसले, प्रा.एस. एम एकतपुरे यांनी प्रा.शिंदे सर यांचे अभिनंदन केले व भावी शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.