आय मिरर
सरडेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंना आदरांजली वाहण्यात आली.सर्वप्रथम सावित्रीमाईंच्या प्रतिमेला ग्रामपंचायत सदस्या वैशाली शिद यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.यावेळी सरपंच सिताराम जानकर,उपसरपंच सतीश चित्राव,रविंद्र सरडे,विजय शिद,गोकुळ कोकरे,हनुमंत जमदाडे,प्रियंका शिद,सुप्रिया कोळेकर,वैशाली कोळेकर,वैशाली शिद,अलका कडाळे,ग्रामसेविका स्वाती चव्हाण,अलका ढावरे,मंगल सिताफ ,आशा कोकरे,ज्ञानेश्वरी वाघमारे ,अतुल ढावरे उपस्थित होते.
यावेळी बोलताना वैशाली शिद म्हणाल्या की, सावित्रीमाईंमुळेच आज महिला शिक्षण घेऊन प्रगती करत आहेत,सावित्रीमाईंचे स्त्रीवर्गावर उपकार आहेत.प्रत्येक लेक शिकून सावित्री झाली पाहिजे.आभार ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी मानले.