आय मिरर
२८ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री ०२ वाजताचे सुमारास पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत मौजे चोपडज येथे पुष्पलता बाळासाहेब जगताप यांच्या घरी अनोळखी चोरट्यांनी दरोडा टाकला होता. यात १० लाखा ७७ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्दे माल चोरी गेला होता.अखेर या गुन्ह्यातील दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखा व वडगाव निंबाळकर पोलीसांना यश आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखा व वडगाव निंबाळकर पोलीसांची संयुक्त कारवाई करत आरोपी संदीपान झुंनझून्या भोसले, मूळ रा. पिंपळी, ता. बारामती, जि. पुणे, सध्या रा. कासूर्डी, ता. दौंड आणि पांड्या उर्फ पांडुरंग गोरख उर्फ गोरया भोसले वय २५ वर्ष, मूळ रा.टाकळी, ता. करमाळा, जि.सोलापूर यांना अटक केली असून त्यांचे ३ साथिदारांचा शोध चालू आहे.
सदरील आरोपी व त्यांच्या साथीदारांनी फिर्यादी यांच्या राहत्या घराचे पाठीमागील सेफ्टी दरवाजाचे आतील कडी काढून घरात प्रवेश केला. फिर्यादीचे तोंड हाताने दाबुन चाकुचा धाक दाखवून तुम चुप रहो आपके पास जो है वह दे दो अशी धमकी दिली.फिर्यादीचे गळयातील तीन तोळा वजनाचे सोन्याचे मनी मंगळसूत्र, दोन्ही हातातील ५ तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगडया, कपाटातील हिरे, सोन्याचे व चांदीचे दागिने व रोख रक्कम ८५ हजार रुपये असा एकुण १० लाख ७७,श्र हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी करुन पळ काढला होता.
सदरचा गुन्हा हा पाच पेक्षा जास्त आरोपींनी केलेला असल्याने गुन्हयास दरोडयाचे वाढीव कलम लावण्यात आले आहे. सदर गुन्हयातील अटक आरोपींकडून गुन्ह्यात गेलेल्या मालापैकी सोन्याचे कानातील टॉप्स व चांदीच्या पट्ट्या जप्त करण्यात आलेल्या असून गुन्हयात वापरलेली होंडा कंपनीची युनिकॉन मोटार सायकल जप्त करण्यात आलेली आहे. ती सुध्दा आरोपांनी चोरून आणलेली असून त्याबाबत तपास चालू आहे.
सदरचा कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल,अपर पोलीस अधीक्षक, बारामती आनंद भोईटे,उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण अविनाश शिळीमकर व वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक अमित शिद-पाटील, एल.सी.बी.पो.काँ.धीरज जाधव,सहा.फौज रविराज कोकरे, बाळासाहेब कारंडे, पो. हवा. स्वप्निल अहिवळे, अभिजित एकशिंगे, सचिन घाडगे, राजू मोमीन, विजय कांचन, आसिफ शेख, सहा फौज.काशिनाथ राजापुरे, वडगाव निंबाळकर पो.स्टे. पो. हवा. सूर्यकांत कुलकर्णी, पो.ना. हिरामण खोमणे, भाऊसाहेब मारकड,पो.कॉ.पोपट नाळे, अमोल भुजबळ, नामदेव साळुंके यांची संयुक्त रित्या केली आहे.
गुन्हयातील आरोपींना दि. ०५ जानेवारी २०२३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे हे करीत आहेत.