आय मिरर
इंदापूर तालुक्यातील गागरगाव येथील वनक्षेत्र परीसरामधील झाडाला गळफास घेतल्याच्या स्थितीत एका इसमाचा मृतदेह आढळला असून अनिकेत संभाजी चव्हाण वय 27 वर्षे रा.सुस्ते ता. पंढरपुर जि.सोलापुर असं मयत इसमाचे नांव आहे.या संदर्भात दादासाहेब शिवाजी चव्हाण वय 40 वर्षे रा.सुस्ते ता. पंढरपुर जि.सोलापुर यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात खबर दिली असून पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
सोमवारी दि. १० जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान हा मृतदेह आढळून आला असून सदर मयत इसमाच्या खिशामध्ये एक मोबाइल मिळुन आला असून त्याचेजवळ एक काळे रंगाची होन्डा युनिकाॅर्न मोटारसायकल नंबर एम एच 12 जेजे 9027 जवळ दिसुन आली आहे. पुढील प्राथमिक तपास पो.ना. गोफने हे करीत आहेत.