आय मिरर
इंदापूर तालुक्यातील विकास कामाच्या श्रेय वादावरून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या श्रेयवादाच्या लढाईत ठिणगी पडली असून दावे प्रतिदाव्यांवर मर्यादित असणारी ही लढाई आता विकास कामाच्या भूमिपूजन व उद्घाटनाचा नारळ कोणी फोडायचा ? इथपर्यंत येऊन पोहचली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस कडून इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथील नऊ कोटीहून अधिक रकमेच्या उद्घाटन आणि भूमिपूजनाचा समारंभ रविवार दिनांक 22 जानेवारी रोजी सायंकाळी आयोजित करताचं याचे श्रेय्य राष्ट्रवादीला जावू नये म्हणून भाजप कडून तातडीने खलबत्ते करुन भूमिपूजन व उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा नारळ राष्ट्रवादी आधिच फोडण्याचा डाव टाकून तसे पाऊल उचलल्याने ही श्रेय वादाची लढाई आता अधिक तीव्र होताना दिसत आहे.
भारतीय जनता पार्टी कडून इंदापूर तालुका अध्यक्ष एडवोकेट शरद जामदार यांच्या अध्यक्षतेखाली व बेलवाडी ग्रामपंचायत च्या नवनियुक्त सरपंच सौ.मयूरी शरद जामदार यांच्या शुभहस्ते रविवारी २२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता विविध विकास कामाचे उद्घाटन व भूमिपूजन पार पडणार आहे. विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने त्याच दिवशी आयोजित केलेल्या सायंकाळच्या भूमिपूजन व उद्घाटन समारंभावर भाजपने सकाळीच उरकलेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाची कुरघोडी भारी ठरणार का ? राष्ट्रवादी त्यांना जाहीर सभेतून सडेतोड उत्तर देऊन गप्प करणार याकडे आता संपूर्ण तालुक्याची नजर लागली आहे.