आय मिरर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या उपक्रमांतर्गत शुक्रवारी २७ जानेवारी रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. इंदापूर शहरातील श्री नारायणदास रामदास हायस्कूल मधील आयोजिय कार्यक्रमात 237 विद्यार्थी सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.या अंतर्गत इंदापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर येथील श्री नारायणदास रामदास हायस्कूल या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 9 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष तेजस देवकाते संघटन सरचिटणीस राजेंद्र पवार , रामभाऊ आसबे व इतर सहकारी उपस्थित होते.