आय मिरर
इंदापूर तालुक्यातील राजकारण दिवसेंदिवस तापत असतानाच शनिवार 28 जानेवारी रोजी दगडवाडी ता. इंदापूर येथे विद्यमान सरपंचांसह पाच ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.यामुळे भारतीय जनता पार्टीला एक प्रकारे राजकीय हादरा बसला आहे.
यामध्ये विद्यमान सरपंच स्वाती केसकर,माजी सरपंच स्वाती आप्पासो पारेकर, महादेव कवितके, पोपटराव काळे,चेअरमन विष्णू काळे, संजय केसकर,आप्पासो पारेकर, नाथा पारेकर, शंकर रासकर, शिवाजी रासकर, किसन मोठे,कुदळे मेंबर, लक्ष्मण रासकर बनकर मेंबर, हर्षदा काळे,सोमनाथ काळे,माणिक रासकर आदींचा समावेश असल्याचं आमदार दत्तात्रय भरणे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
यावेळी महादेव कवितके म्हणाले की आम्ही दत्तात्रय भरणे यांच्या कामाचा झंझावात पाहिला आणि खर बोलणारी माणसे या पक्षात आहेत यामुळे आम्ही प्रवेश करतो आहे. त्याच बरोबर खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणणारी पदाधिकारी या पक्षात आहेत तसेच गावात आमचा सरपंच भाजप पक्षाचा म्ह्णून निवडून आणला होता असे असताना आम्ही न मागता दगडवाडी सारख्या गावात निधी भरपूर मिळाला.
या गावाला निरवांगी ते दगडवाडी असेल तसेच सराफवाडी रस्ता असेल अशी अनेक कामे मामांनी मंजूर केली. या बद्दल आम्ही सर्व दगडवाडीच्या वतीने आमदार भरणे मामांचे आभार मानतो.यापुढे आमदार भरणे मामांच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रवादी पक्षात काम करत राहू आणि पक्षाला इथून पुढील काळात जास्तीत जास्त मतदान होईल अशी ग्वाही दिली.
यावेळी दगडवाडी येथे श्रीक्षेत्र नंदिकेश्वर मंदिरास भेट देऊन मंदिर परिसरातील सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली.तसेच यावेळी “क” वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत डीपीडीसी च्या माध्यमातून मंजूर केलेल्या १५ लाख रुपयांच्या सुशोभिकरणाच्या कामाचे भूमिपूजन तसेच जल जीवन मिशन योजनेच्या अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजने करता मंजूर केलेल्या १ कोटी ७४ लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाले.
या पाणीपुरवठा योजनेमुळे दगडवाडी गावातील महिलांच्या डोक्यावरील हंडा कायमस्वरूपी उतरणार असून नागरिकांना स्वच्छ घरपोच पाणी मिळणार आहे. तसेच दगडवाडी ते निरवांगी येथील रस्त्याकरिता 5 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर केला आहे या कामाची प्रत्यक्षात सुरवात थोड्याच दिवसात सुरू होईल असेही यावेळी दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
या भूमिपूजन प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील,तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,सचिन सपकळ,शुभम निंबाळकर,नंदू पाटील रनवरे,छायाताई पडसळकर,तसेच निरवांगी खोरोची,घोरपडवाडी, निमसाखर,चाकाटी,रेडा,तरंगवाडी, गोखळी, सराफवाडी, पिटकेश्वर येथील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.