आय मिरर
आज बारावीच्या विद्यार्थ्यांचा पहिला पेपर पार पडतो आहे.पुणे जिल्ह्यातील इंदापूर मध्ये भाजपाचे जेष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी परिक्षा केंद्रावर जावून परिक्षार्थी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या आहेत.
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंदापूर मधील दोन्ही केंद्रवर जवळपास ११०० विद्यार्थी हे बारावीची बोर्डाची परीक्षा देत आहेत.विद्यार्थ्यांनी वर्षभर मेहनत घेतली आहे.विद्यार्थ्यांनी अतिशय संयमाने शांततने तानतणाव न घेता व्यवस्थित आपापला पेपर सोडवावा.प्रश्नपत्रिका हाती मिळताच थोडक्या वेळेत ती अगोदर वाचून घ्यावी वेळ न घालवता ज्या प्रश्नांची उत्तरे आपणांस माहित आहेत ती अगोदर सोडवावीत आणि उर्वरित वेळत इतर प्रश्न सोडवावेत अशा शुभेच्छा यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी दिल्या आहेत.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष शकिलभाई सय्यद,सहसचिव बाळासाहेब खटके,मोहन दुधाळ,स्वप्निल सावंत यांसह शिक्षक वर्ग उपस्थित होता.