आय मिरर
दोन वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत फरारी असलेल्या आरोपीस जेरबंद करण्यात इंदापूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला यश आल्याची माहिती इंदापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.बालाजी महादेव तिकोटे (वय 32 वर्षे) राहणार- बेडसिंग तालुका- इंदापूर असे पोलिसांनी अटक केलेल्या फरारी आरोपीचे नाव आहे.
इंदापूर शहरातील तहसील कचेरीत आरोपी तिकोटे हा येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच या ठिकाणी इंदापूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेऊन अटक केली आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सुधीर पाटोळे, प्रकाश माने, ज्ञानेश्वर जाधव, सलमान खान ,नंदू जाधव, लक्ष्मण सूर्यवंशी, विनोद काळे यांनी केली असून सदर गुन्ह्याचा तपास बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे करीत आहेत.