आय मिरर
पुणे – सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत चालकाचे चारचाकी गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दोघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. १२) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
वैभव विठ्ठल जांभळे (वय -२४, रा. तक्रारवाडी, ता. इंदापूर) प्रतीक पप्पू गवळी (वय – २२ रा. मोशी ता. हवेली) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
तर या अपघातात आसिफ बशीर खान (वय – २२ रा. भिगवन, ता. इंदापूर) सुरज राजू शेळके वय – २३ वर्ष रा. भिगवण ता. इंदापुर) व ऋषिकेश बाळासाहेब येळे वय -२२, रा. इंदापूर ता. इंदापूर) अशी अपघातात जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. जखमींवर भिगवण येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे – सोलापूर महामार्गावरून सोलापूरच्या दिशेने हे पाचहि जण चारचाकी गाडीतून निघाले होते. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हॉटेल पंचरत्न जवळ येताच कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटली.
दरम्यान, यामध्ये रस्त्यावरच चारचाकी गाडीने ३ पलट्या मारल्याची माहिती स्थानिकांनी दिली. यामध्ये दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तपास रावणगाव पोलिस करीत आहेत.