आय मिरर
मी पवारांच्या विरोधात बोलतो याचा अर्थ तुम्ही निट समजून घ्या कारण पवार नावाची कीड या महाराष्ट्राला लागली आहे आणि ही तुम्हाला मूळासकट उपटून टाकावी लागेल तरच तुम्हाला कायतरी न्याय मिळेल अशी जहरी टीका भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी रविवारी(ता.२६ ) मार्च रोजी इंदापूरातील जाहीर सभेत केली.
चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते बारामती लोकसभा मतदार संघात 52 भाजपा युवा मोर्चा आणि युवा वाॅरियर्स शाखांची उद्घाटने पार पडली आहे.यानंतर इंदापूर नगरपरिषद प्रांगणात जाहिर सभा पार पडली यावेळी ते बोलत होते.यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील,भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील,युवा मोर्चा चे प्रदेश सचिव दीपक काटे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांसह भाजपाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पडळकर म्हणाले की,महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर 2014 साली विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मुंबई कोकण खाणदेश या सर्व भागांचा सारासार विचार करुन शेतकऱ्यांसाठी नेमकं काय लागतेय त्याच योग्य सोल्युशन काढणारा देवेंद्र फडणवीस यांसारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला पहिल्यांदाच लाभल्याचेही त्यांनी म्हटल आहे.
“तरचं शरद पवार पंतप्रधान होतील”
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर या देशात तीन राज्यांची नव्याने निर्मिती करावी लागेल.एक लवासा दुसरे मगरपट्टा आणि तिसरी बारामती. बारामतीचे मुख्यमंत्री अजित पवारांना करावा लागेल लवासा सिटी सुप्रिया सुळे तर मगरपट्ट जयंत पाटलांकडे द्यावा लागेल आणि या तीन राज्यांचा मिळून एक देश केल्यास शरद पवार हे पंतप्रधान होतील अशी खोचक टीका भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी इंदापूर मधील जाहीर सभेत केली आहे. गोपीचंद पडळकर यांनी हे वक्तव्य करताच उपस्थितांमध्ये यावेळी एकच हशा पिकला.