नवी दिल्ली || केंद्रीय अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. अर्थसंकल्पात सर्वच घटकांचा विचार करण्यात आला आहे असे नमूद करतानाच पंतप्रधानांनी अर्थमंत्र्यांचे कौतुक केले आहे.
‘शंभर वर्षातील सर्वात भयंकर संकटाला सामोरे जात असताना हा विकासाचा नवा विश्वास घेऊन आला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी देणारा हा अर्थसंकल्प आहे’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
शंभर वर्षातील सर्वात भयंकर संकटाला सामोरे जात असताना हा अर्थसंकल्प विकासाचा नवा विश्वास घेऊन आला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी देणारा हा अर्थसंकल्प आहे’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
या अर्थसंकल्पात सर्वच घटकांचा विचार करण्यात आला असून अनेक नव्या संधींची कवाडे या माध्यमातून खुली होणार आहेत, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. गरिबवर्गाचे कल्याण हा अर्थसंकल्पातील सर्वात मोठा संकल्प असल्याचे नमूद करत पंतप्रधानांनी सर्वसमावेशक बजेट मांडल्याबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन केले.