इंदापूर || कांदलगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाळू गिरी यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पद रिक्त झाले होते.त्या जागी सौ.तेजमाला बाबर यांची वर्णी लागली आहे.
बुधवारी त्यांच्या या पदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच रवींद्र पाटील,सदस्य उल्हास पाटील,किसन सरडे,बाळू गिरी,विजय सोनवणे,रेखा बाबर,कमल राखुंडे,कोंडाबाई जाधव ,दशरथ बाबर उपस्थित होते.
बुधवारी दि.25 रोजी उपसरपंच निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन सरपंच श्री.रविंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.उपसरपंच या पदासाठी सौ.तेजमाला बाबर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता.त्यामुळे सरपंच श्री.रविंद्र पाटील यांनी तेजमाला बाबर यांना उपसरपंच म्हणून घोषित केले.अध्यासी अधिकारी म्हणून ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी काम पाहिले.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून ही सभा घेण्यात आली.यानंतर ग्रामपंचायत सदस्य विजय सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच श्री.रविंद्र पाटील यांच्या हस्ते वाफेचे मशीन व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी पांडुरंग इंगळे व संतोष बाबर यांनी प्रयत्न केले.