इंदापूर || बीजवडी येथील पोस्टमन प्रकाश चव्हाण आपल्या घराशेजारी बागेमध्ये काम करत असताना त्यांना अचानक साप दिसला. त्यांनी त्वरीत जवळील सर्पमित्रास संपर्क केला असता सर्पमित्र पोपट बुनगे, नवनाथ सोनटक्के उमाकात लाठोर त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी या सर्पाची पाहणी केली असता हा बिनविषारी जातीचा दुर्मिळ प्रजातीचा चित्रांग नायकुळ सर्प असल्याचे निदर्शनास आले. त्यास सुखरूप रित्या पकडून वनविभागाचे कर्मचारी संतोष गित्ते यांना संपर्क करून या सापास निसर्गाच्या सानिध्यात पुन्हा सुखरूप रित्या सोडण्यात आले.

आतापर्यंत ह्या प्रजातीचा साप नाणेघाट, फलटण, बारामती, अहमदनगर, पुणे,सोलापूर तसेच मध्यप्रदेश नंतर इंदापूर तालुक्यात ह्या प्रजातीचा सर्प प्रथमच सापडला आहे. ह्या सापाची सरासरी लांबी 2 फूट होती व तो बिनविषारी असल्याचे सर्पमित्र पोपट बुनगे यांनी सांगितले.