इंदापूर : आय मिरर
रोटरी क्लब ऑफ इंदापूर आणि रोटरी क्लब ऑफ सहवास यांच्या संयुक्त विद्यमाने बंगलोरच्या “सिंपली स्पोर्ट्स फाउंडेशन” च्या सहकार्याने ” कम्युनिटी डेव्हलपमेंट थ्रु स्पोर्ट्स” म्हणजेच “खेळातून समाजसुधारणा” हा महत्वाकांक्षी कार्यक्रम ९ ऑगस्ट २०२२ रोजी इंदापूर येथे आयोजित करण्यात आलाय.
आज मंगळवारी सकाळी ९ वाजता इंदापूर क्रिडा संकूल या ठिकाणी इंदापूर शहरातील सहा हायस्कूल मधिल प्रत्येक १० खेळाडूंना बोलावण्यात आले आहे. या साठ खेळाडूंचे उंच उडी,लांब उडी,धावणे,भाला फेक,थाळी फेक,गोळा फेक अशा विविध क्रिडा प्रकारात परीक्षण करुन त्यातून प्रत्येकी प्रकारात २ खेळाडू प्रमाणे १२ खेळाडून निवडण्यात येतील. तर सायंकाळी ५ वाजता ज्युदो मधून अशाच प्रकारे खेळाडू निवडण्यात येतील. या प्रकल्पा अंतर्गत निवडण्यात आलेल्या १८ वर्षाखालील तरुणांची त्यांच्या आवडीच्या खेळात प्रशिक्षण देऊन , खेळ या माध्यमातून व्यावसायिक संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात रोटरी च्या माध्यमातून येणार आहे.पुढील वर्षभर रोटरी कडून त्यांना मार्गदर्शन आणि सर्व सुविधा पुरवण्यात येतील.
तर निवड झालेल्या मुलांना आहारतज्ञ, शरीरसौष्ठव व मनोवैज्ञानिक तज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.या प्रकल्पाचा शुभारंभ रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१च्या रोटरी वर्ष २३-२४च्या भावी अध्यक्षा रो. मंजू फडके यांच्या हस्ते ९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता होणार आहे.