“दरम्यान ही घटना समजताचं बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर, सहा.पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील ,प्रकाश पवार आदींसह अंगुली मुद्रा पथक आणि पुणे ग्रामीणच्या श्वान पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.सदर गुन्हाचा तपास वेगाने सुरू केला आहे.या कामी तीन तपास पथके रवाना केली आहेत.”
इंदापूर : आय मिरर
बावडा गावचे हद्दीत काकडेवस्ती येथे अनोळखी दरोडेखोरांनी एका कुटुंबाला बेदम मारहाण करत लाखो रुपयाचा ऐवज लंपास केला आहे.ही घटना गुरूवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.या संदर्भात अनिता अंकुश काकडे वय ३५ वर्षे रा. काकडेवस्ती बावडा ता. इंदापुर जि. पुणे यांनी इंदापूर पोलिसात फिर्याद दिली असुन इंदापूर पोलीसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेत अंदाजे २० हजार रुपये किंमतीचे अर्धा तोळे वजनाचे सोन्याचे मनीमंगळसुत्र,अंदाजे २३ हजार रुपये किमतीचे अर्धा तोळे वजनाचा सोन्याचा गंठन, अंदाजे २३ हजार रुपये किमतीचे अर्धा तोळे वजनाचे कानातील टाॅप्स,अंदाजे २२ हजार रुपये किमतीची अर्धा तोळे वजनाचे सोन्याची ठुशी, अंदाजे ८ हजार रूपये किमतीच्या दोन ग्रॅम वजनाच्या कानातील सोन्याचा रिंगा, अंदाजे १२ हजार रुपये किमतीची तिन ग्रॅम वजनाची कानातील सोन्याची फुले,अंदाजे ३ हजार रुपये किंमतीचे पायातील चांदीचे पैजन आणि ७०० रूपये किंमतीची नाकातील सोन्याची मुरणी असा एकूण १ लाख ११ हजार ७०० रुपयाचा ऐवज दरोडेखोरांनी घेऊन धूम ठोकली.
याबाबत अधिक माहिती अशी की,दि.१५ सप्टेंबर २०२२ रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास अनिता काकडे यांना घराची खिडकी वाजल्याचा आवाज आला.त्यांनी उठुन खिडकी जवळ जावुन पाहीले असता कोणीही दिसून न आल्याने खिडकी बंद करून अनिता काकडे पुन्हा अंथुरणावर येऊन झोपल्या.
तद्नंतर पाच मिनिटांनी घराचा दरवाजा वाजलेचा आवाज आलेने अनिता काकडे यांनी उठुन दरवाजा पाहीला त्यावेळी त्यांना दरवाजा बंद दिसला.याच दरम्यान दरवाजाला बाहेरून कोणीतरी जोराचा धक्का दिला. दरवाजाला आतून असलेली कडी तुटली व दरवाजा उघडला गेला.त्यावेळी चार अनोळखी इसम घरामध्ये शिरले.
आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता एका इसमाने अनिता काकडे यांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावुन तोडुन घेतले व त्यांना हाताने मारहाण केली.तर एक इसम हा घरामधील कपाटाचे जवळ जावुन त्याने कपाट उघडुन कपाटातील सर्व साहीत्य अस्ताव्यस्त फेकून कपाटातील दागीने काढुन घेतले.तर बाहेर थांबलेल्या दोन अनोळखी इसमांनी अनिता यांच्या पतीला मारहाण करत त्यांना घरामध्ये घेवुन आले.या दरोडेखोरांनी चाकु चा धाक दाखवुन अनिता काकडे यांच्या कानातील फुले व त्यांच्या मुलीच्या कानातील रिंगा काढून घेतल्या. तुम्ही कोणाला सांगीतल्यास अथवा आरडा ओरडा केल्यास तुम्हाला सर्वांना जिवे मारून टाकीन अशी धमकी दिली.त्यानंतर माकडे कुटुंबातील चौघांना घरामध्ये कोडुन बाहेरून कडी लावुन निघुन दरोडेखोर फरार झाले.
सदर गुन्हाचा तपास बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर आणि सहा. पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील करीत आहेत.