इंदापूर : आय मिरर
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शंभर रुपयात बँकेचे खाते व दोन लाख रुपये पर्यंतचा आपघाती विमा ही योजना देण्यात आली असून ही योजना सामान्य नागरिकांसह सर्वांसाठीच्याचं संरक्षणासाठी अत्यंत महत्वाची असल्याचं प्रतिपादन शहा ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिलीप पाटील यांनी केले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून आर्थिक व डिजिटल साक्षरता बाबत महत्त्व पटवून देण्याकरिता शहा गावात गुरूवारी दि.२९ सप्टेंबर रोजी कार्यक्रम पार पडला याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमास बँकेचे मॅनेजर दयानंद खरात, बँक अधिकारी गणेश खटके,मंगेश बनसोडे,प्रमोद मोरे,सतिश गंगावणे,रवींद्र करे, संतोष कडवळे,हरिभाऊ गंगावणे, दत्तात्रय पाटील,नितीन निकम,संतोष निकम, बाळासाहेब इजगुडे,महिपती गंगावणे, शिवाजी जगदाळे, समाधान धाईंजे,विकास नगरे,महादेव माने यांसह महिला वव शहा गावातील ग्रामस्त उपस्थित होते.
उपसरपंच पाटील म्हणाले की,जीवन हे अत्यंत धकाधकीचे झाले आहे. धावपळीचे युग असून अशा धकाधकीच्या जीवनात विमा पॉलिसी अत्यंत महत्वाची आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गावातील ९० टक्के कामगार वर्ग हा कामासाठी खाजगी वाहन,रिक्षा किंवा इतर वाहनातून कामासाठी जातात.यात महिला वर्ग जास्त आहे.मागील काही दिवसापूर्वी एक अपघात झाला होता,या अपघातात गावातील एका महिलेला आपण सर्व जन प्रयत्न करून देखील वाचवू शकलो नाही. त्यांच्या जाण्याने गावातील सर्व ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली होती.
एखाद्या अपघाताने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीमध्ये विमा असणं अत्यंत महत्त्वाचा आहे. विम्यामुळे एखाद्या व्यक्तीला आपण मृत्यूपासून रोखू शकत नाही,मात्र एखाद्या व्यक्तीचा अपघात झाल्यास त्याला आर्थिक मदत या विम्यातून मिळते.जे त्याचं कुटुंब सावरण्यासाठी महत्त्वाची असते. विम्याच्या कवचामुळे आरोग्याच्या उपचारासाठी आर्थिक मदत मिळवता येते. त्यामुळे बँकेने राबवलेली योजना अत्यंत महत्त्वाची असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पाटील यांनी केलं.