इंदापूर : आय मिरर
नितीन खिलारे हे वयाच्या १५ व्या वर्षी फोटोग्राफी क्षेत्रात आले. इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण चालू असताना नितीन यांचे मोठे बंधू विकास आणि फोटोग्राफर अवधूत पाटील हे मित्र होते.त्यांच्यात आणि खिलारे कुटुंबियांच्यात एक मैत्रीपूर्व नातं होतं आणि यातूनचं अगदी बालवयात नितिन खिलारे यांची बोटं नकळतं एफ.एम.-१० रोल कॅमेऱ्याच्या लेंन्सवर पडली अनं तिथूनच खरी सुरवात झाली.
एकोणीस वर्षात तब्बल साडेतीन हजार हून अधिक विवाह सोहळे व शुभ कार्याचे क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करणारा हा अवलिया नितीन मामा आज मात्र हजारोंसाठी प्राण वाचणारा देवदूत ठरलायं.
वयाच्या पंधराव्या वर्षी कॅमेऱ्यावर पडलेले ते हात आज वयाच्या ३६ व्या वर्षी मात्र अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जातात.कोणत्याही क्षणी नितीन मामा ला कोणीही फोन करा तो एका पायावर तयारचं असतो. रात्री अपरात्री जेव्हा मोठा सायनर वाजतो आणि अनं डोळ्याचं पातं लवतं ना तोचं भुर्रर्र…कनं अशा वेगात वाहन निघून जातं तेव्हा अवघे इंदापूरकर खात्रीने सांगतात तो खिलारे मामाचं होता.
मात्र मामाची ही धरपडं, त्याच्या गाडीचा वेग, अनं कर्कश्य आवाजातला वाजणारा सायनर कोणा सोबतच्या शर्यतीसाठी नसतो तर कोणाचा तरी जीव वाचण्यासाठी असतो ! याच कार्याची दखल घेत नितिन मामा खिलारे यांना इंदापूर फोटोग्राफर असोसिएशन आणि महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गौरवण्यात आलेयं.त्यांच्या या गौरवाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
इंदापूर फोटोग्राफर असोसिएशन आणि महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने निकाॅन कॅमेरा च्या माहितीची कार्यशाळा शुक्रवारी दि. ३० सप्टेंबर रोजी पार पडली.यात फोटोग्राफी क्षेत्रात काम करत असताना “देवदूत” म्हणून रुग्णसेवेच्या सामाजिक कार्याबद्दल सन्मान चिन्ह देवून खिलारे मामाचा सन्मान करण्यात आला.खिलारे यांचे बंधु विकास खिलारे यांनी हा सन्मान स्वीकारला आहे. जो सन्मान मिळणार होता तो स्वीकारतानाही मामा मात्र आपलं कर्तव्य चोख बजावत होता याची खंत मात्र सर्वांच्या मनात राहिली.
सध्या नितीन खिलारे हे स्वर्गीय पै.पांडुरंग रामचंद्र खिलारे गुरुजी प्रतिष्ठानच्या माध्यमातून रुग्णसेवा करतात. प्रतिष्ठान संचलित रुग्णवाहिकेतून त्यांनी आजपर्यंत अनेकांना जीवदान दिलयं.मामा या नावाप्रमाणेच प्रत्येकाला आपलासा वाटणारा हा मामा कर्तव्याबाबत हि तितकाचं प्रामाणिक आहे. वेळप्रसंगी मदतीसाठी धावून गेलेला मामा कधी कधी स्वत:च्या खिशाला सुध्दा चरफाटा बसवतो मात्र सेवा देण्यात कमी पडत नाही.पुढच्यांची वेळ जाणून हे आपलचं कुटुंब म्हणून तो नेहमी एक पाऊल पुढे असतो…आणि याचं गुणांमुळे एक नव्हे तर हजारोंना तो कायमचं एक पाऊल पुढे राहिल याबद्दल आत्मविश्वास वाटतो.अशा या देवदूतास आय मिररचा ही सलाम……